सजंय याने विष प्राशन केल्यानंतर त्याला उलट्या हाेण्यास सुरुवात झाली. ही बाब घरातील व्यक्तींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संजयला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वैनगंगा नदीघाटावर अंतिमसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, १० वर्षांची मुलगी, ५ वर्षांचा मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. मागील काही दिवसांपासून ताे उदासीन असल्याचे दिसून येत हाेते. दाेन दिवसानंतर माझ्या मरणाला यावे लागेल असेही ताे मित्रांना सांगत हाेता. मात्र मित्रांनी त्याच्या बाेलण्याकडे लक्ष दिले नाही. संजय हा लसून विक्रीचा व्यवसाय करीत हाेता. त्याने ६ लाख ५० हजार रुपयांचे बॅंकेचे कर्ज घेतले हाेते. मात्र व्यवसायात ताेटा झाल्याने त्याचा व्यवसाय बंद पडला. कर्जामुळे त्याने आत्महत्या केली अशी माहिती त्याच्या नातेवाइकांनी दिली.
160821\16gad_4_16082021_strgad00784.jpg
मृत संजय बंडू सोमनकार