गडचिराेली : जिल्ह्यात उन्हाळी मूग पिकाचे क्षेत्र वाढत आहे. आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मूग लागवड गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी माेठ्या प्रमाणावर मूग पिकाची लागवड करावी, असे प्रतिपादन केंद्रीय कापूस संशाेधन संस्था नागपूरचे डाॅ. वाय. जी. प्रसाद यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र, आत्मा, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी प्रशिक्षण व कार्यशाळा १० फेब्रुवारीला कृषी विज्ञान केंद्रात पार पडली. याप्रसंगी ते बाेलत हाेते. कार्यशाळेला कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक तथा आत्माचे प्रकल्प संचालक डाॅ. संदीप कऱ्हाळे, आदिवासी विकास कार्यक्रम प्रमुख डाॅ. चिन्ना नायक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. चंद्रशेखर एम. , डाॅ. दीपक नगराळे, विभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब कदम, विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) डाॅ. व्ही. एस. कदम, विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी) ज्ञानेश्वर ताथाेड, विषय विशेषज्ञ (कृषी हवामानशास्त्र) एन. पी. बुद्धेवार, विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) पी. ए. बाेथीकर उपस्थित हाेते.
डाॅ. चिन्ना नायक यांनी धान पिकासह कडधान्य पिकाचे उत्पादन घेऊन शाश्वत विकास करावा, जिल्ह्यात उत्तम हवामान असल्याने कडधान्य पिके सहज शक्य आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कडधान्य पिकाची लागवड करावे, असे आवाहन केले. डाॅ. दीपक नगराळे यांनी कापसावरील राेग, कीडी, बाेंडअळी, बाेंडसड आदींचे एकात्मिक व्यवस्थापन करून नुकसान टाळावे, असे आवाहन केले. संदीप कऱ्हाळे यांनी प्रास्ताविकातून आराेग्याच्या दृष्टीने मुगाची आवश्यकता सांगितली. डाॅ. रवींद्र वाघमारे यांनी मूग लागवडीचे फायदे सांगत मूग पिकामुळे नत्रस्थिरीकर करून ठेवण्यास मदत हाेते. त्यामुळे जमिनीची धूप थांबते व जमिनीचे आराेग्य चांगले राहते, असे प्रतिपादन केले. एन. पी. बुद्धेवार यांनी मूग पिकाची लागवड, तंत्रज्ञान, कीडराेग तसेच पाणी व्यवस्थापन, हवामान आदी बाबींची माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन विनाेद रहांगडाले यांनी केले. यशस्वीतेसाठी हवामान निरीक्षक माेहित गणवीर, हितेश राठाेड, गजेंद्र मानकर, शशिकांत सलामे, अंकुश ठाकरे, प्रवीण नामूर्ते तसेच आत्मा कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
बाॅक्स ....
आदिवासी शेतकऱ्यांना मूग बियाणे वाटप
कृषी विज्ञान केंद्रात पार पडलेल्या शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळेत आदिवासी लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी निविष्ठाच्या स्वरूपात मूग बियाण्यांचे वाटप करण्यात आले. याचा लाभ अनेकांना झाला. प्रशिक्षणात जवळपास १५० शेतकरी उपस्थित हाेते. येथे मिळालेल्या माहितीबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.