कुरखेडा तालुक्यात प्रामुख्याने धान पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शेतकऱ्याचे संपूर्ण आर्थिक नियोजन धान पिकांच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. खुल्या बाजारात शेतकऱ्यांना धान पिकाचे उचित मूल्य मिळत नसल्याने दरवर्षी शासनाकडून खरीप व रब्बी हंगामात आधारभूत किमतीत धान खरेदी करण्यात येते. या वर्षीसुद्धा खरीप हंगामात आदिवासी विकास महामंडळामार्फत धान खरेदी करण्यात आली. परंतु शासनाने घोषणा करूनही आतापर्यंत अर्धाच बोनस वितरित केला आहे. एकीकडे बोनसची रक्कम प्रलंबित आहे. त्यातच मागील दोन महिन्यांपासून रब्बी धान व मका खरेदीचे चुकारे अजूनपर्यंत थकीत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. शेतकऱ्यांना खते, औषधी व मजुरी देण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे. परंतु बाेनस व चुकारे मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमाेर माेठे संकट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा कुरखेडा आविका संस्थेचे उपाध्यक्ष चांगदेव फाये, सहकार नेते खेमनाथ डोंगरवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणपतराव सोनकुसरे, माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, कुरखेडा आविका संस्थेचे अध्यक्ष बाबुराव तुलावी, प्रगतशील शेतकरी माधव तलमले उपस्थित होते.
बाॅक्स
संस्थांचे कमिशन व मंडीचार्ज प्रलंबित
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे कमिशन, मंडी चार्ज थकीत आहे. त्यामुळे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. रखडलेले कमिशन व मंडी चार्ज देण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. परंतु दुर्लक्ष झाल्याने संस्थांनाही आर्थिक अडचणी जाणवत आहेत. त्यामुळे संस्थांच्याही हिताचा विचार करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्यावतीने करण्यात आली.
200821\5959img-20210820-wa0164.jpg
उपविभागीय अधिकारी समाधान शेडगे याना निवेदन देताना भाजपा शिष्टमंडळ