लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील आठ दिवसांपासून उन्हाचा प्रकोप सुरू आहे. नागरिकांना मे हिटचा चांगलाच तडाखा बसत आहे. मागील आठ दिवसांपासून तापमानाने ४४ अंशाचा आकडा पार केला आहे. रविवारी व सोमवारी कमाल तापमान ४५.८ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. यावर्षीच्या उन्हाळ्यातील हे दोन दिवस सर्वाधिक हॉट दिवस ठरले आहेत.मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच तापमानात वाढ होण्यास सुरूवात झाली होती. मे महिन्यात २० तारखेपर्यंत तापमान ४३ ते ४४ अंशाच्या दरम्यान होते. २० तारखेनंतर तापमानाने ४४ अंशाचा पाराही पार केला. मात्र २५ मे पर्यंत ते ४५ अंशाच्या आतच होते. २५ मे रोजी ४५.४ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यानंतर पुन्हा २६ मे रोजी ०.४ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होऊन ४५.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविल्या गेले. वाढलेले तापमान सोमवारीही कायम होते. सोमवारी सुध्दा ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. मागील दोन दिवसांपासून कडक ऊन पडत असल्याने घरातील कुलर लावूनसुध्दा गर्मी जाणवत आहे. अशातच अधूनमधून वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.उष्णतेची लाट कायम राहणारउष्णतेची लाट आणखी चार ते पाच दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मान्सून लांबल्याने उष्णतेचा कालावधी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हामुळे उष्माघात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी शक्यतो उन्हात काम करणे टाळावे. सकाळी किंवा सायंकाळीच कामे करावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले आहे.
रविवार व सोमवार ठरले सर्वाधिक हॉट दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:32 PM
मागील आठ दिवसांपासून उन्हाचा प्रकोप सुरू आहे. नागरिकांना मे हिटचा चांगलाच तडाखा बसत आहे. मागील आठ दिवसांपासून तापमानाने ४४ अंशाचा आकडा पार केला आहे. रविवारी व सोमवारी कमाल तापमान ४५.८ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. यावर्षीच्या उन्हाळ्यातील हे दोन दिवस सर्वाधिक हॉट दिवस ठरले आहेत.
ठळक मुद्देपारा ४५.८ अंश सेल्सिअवर : मे हिट कायम राहणार