गानली समाज माेर्चात सहभागी हाेणार
२२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या माेर्चाला गानली समाज शिक्षण व कल्याण मंडळ गडचिराेली यांनी पाठिंबा दर्शविला आहे. या माेर्चात ओबीसी बांधवांनी माेठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गानली समाजाचे तालुकाध्यक्ष अशाेक तुकाराम चन्नावार यांनी केले आहे.
गडचिराेली जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण १९ टक्क्यांवरुन ६ टक्क्यांवर आणण्यात आल्याने समाजावर अन्याय झाला आहे. नाेकरीची संधी मिळत नसल्याने ओबीसी समाजात बेराेजगारांची फाैज निर्माण हाेत आहे. अशातच पेसा कायदा लागू करण्यात आल्याने पुन्हा ओबीसींपुढे नाेकरीसंदर्भात अडचणी आहेत. त्यामुळे आपल्या न्याय मागण्यांसाठी ओबीसी बांधवांनी माेर्चात माेठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गानली समाजाचे तालुकाध्यक्ष अशाेक चन्नावार, उपाध्यक्ष रवी चन्नावार, सचिव रवींद्र आयतुलवार, काेषाध्यक्ष मनाेहर गुंडावार, सहसचिव नितीन संगीडवार, सदस्य प्रकाश ताेडेवार, वीरेंद्र वडेट्टीवार, बंडू वडेट्टीवार, भास्कर वडेट्टीवार, नितीन मुलकलवार, अविनाश टेप्पलवार, निकेतन गद्देवार, मनीष काेतपल्लीवार, ममता काेतपल्लीवार, सुरेखा चन्नावार यांनी केले आहे.
प्रांतिक तेली समाजाचा माेर्चाला पाठिंबा
ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी २२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या माेर्चाला प्रांतिक तेली समाजाने पाठिंबा दर्शविला आहे. या माेर्चात ओबीसी बांधवांनी माेठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर वासेकर, कार्याध्यक्ष देवाजी साेनटक्के, उपाध्यक्ष विनाेद खाेबे, गजानन भांडेकर, अरुण निंबाळकर, ॲड. रामदास कुनघाडकर, चाेखाजी भांडेकर, अनिल काेठारे, दादाजी बारसागडे, किसन शेट्टे, श्रावण दुधबावरे, अरुण दुधबावरे, विठ्ठल काेठारे, सुधाकर दुधबावरे, सुरेश भांडेकर, विलास निंबाेरकर, विष्णू कांबळे, प्रा. देवानंद कामडी, नरेंद्र भरडकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
जैन कलार समिती माेर्चात सहभागी हाेणार
ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी २२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या माेर्चाला जैन कलार समितीने पाठिंबा दर्शविला आहे. या माेर्चात ओबीसी बांधवांनी माेठ्या संख्येने सहभागी हाेऊन ओबीसी समाजाची ताकद दाखवून द्यावी. तसेच जिल्हाभरातील जैन कलार बांधव व ओबीसी प्रवर्गातील सर्व समाजबांधवांनी माेर्चात माेठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जैन कलार समितीचे अध्यक्ष विनाेद शनिवारे, उपाध्यक्ष भूषण समर्थ, सचिव मनाेज कवठे, सहसचिव नितीन डवले, काेषाध्यक्ष रणधिवे, सदस्य डाॅ. संजय भांडारकर, रतन शेंडे, डाॅ. समर्थ, पेशने यांनी केले आहे.
माेर्चात सहभागी हाेणार आजी-माजी पदाधिकारी
गडचिराेली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी ओबीसी समाजाच्या वतीने २२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या माेर्चाला विविध पक्षाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. ओबीसींच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी माेर्चात सहभागी हाेण्याचे आश्वासन दिले आहे. ओबीसी माेर्चाला आ. अभिजित वंजारी, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, आ. परिणय फुके, आ. संजय कुंटे यांनी पाठिंबा देऊन स्वत: मोर्चात सहभागी हाेणार असल्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती जिल्हा ओबीसी समन्वय समितीचे कार्यकर्ते तथा युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिली.