लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासन व प्रशासनाने लॉयड मेटल्स कंपनीला काम सुरू करण्याचे निर्देश द्यावे, कंपनीने काम लवकर सुरू करावे आदीसह विविध मागण्यांसाठी लोहखाणीच्या विविध विभागात काम करणारे कामगार ५ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार आहेत. याबाबत कामगारांनी उपोषणाची परवानगी मागणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी दिले.निवेदनात नमूद केल्यानुसार, गेल्या १५ दिवसांपासून कोणतेही कारण न सांगता लॉयड मेटल कंपनीने काम बंद केले आहे. त्यामुळे सुरजागड पहाडीवर काम करणाºया जवळपास ७०० ते ८०० लोकांचा रोजगार हिरावला आहे. परिणामी आमच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. कंपनीने मजुरांना २५ दिवस काम द्यावे, कोनसरी येथे होत असलेल्या प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, आदी मागण्या कामगारांनी निवेदनात केल्या आहेत.
सुरजागड पहाडीवरील कामगारांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 10:32 PM
शासन व प्रशासनाने लॉयड मेटल्स कंपनीला काम सुरू करण्याचे निर्देश द्यावे, कंपनीने काम लवकर सुरू करावे आदीसह विविध मागण्यांसाठी लोहखाणीच्या विविध विभागात काम करणारे कामगार ५ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार आहेत. याबाबत कामगारांनी उपोषणाची परवानगी मागणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी दिले.
ठळक मुद्देआजपासून बसणार : काम सुरू करण्याची मागणी