लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील सुरजागड पहाडावर लॉयड्स मेटल्सकडून सुरू असलेल्या लोहखनिज खणन कामादरम्यान नक्षलवादी आल्याची माहिती कोणीतरी पसरविल्याने चांगलीच दहशत निर्माण झाली. त्यामुळे सोमवारी (दि.२६) येथील लोहखनिज वाहतुकीचे काम ठप्प पडले होते.यापूर्वी डिसेंबर २०१६ मध्ये सुरजागड पहाडावरून लोहदगडाचे खणन आणि वाहतूक सुरू असताना नक्षलवाद्यांनी भर दुपारी ८० वाहनांची जाळपोळ केली होती. अनेकांना मारझोडही झाली होती. त्यामुळे नक्षलवादी आल्याचे वृत्त पसरताच तिथे काम करणाऱ्या ६०० हून अधिक मजुरांमध्ये दहशत पसरून काही वेळ पळापळ झाली.या लोहखनिज प्रकल्पाकडे मुख्यमंत्र्यांचे विशेष लक्ष आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे. लोहखनिजाची वाहतूक करतानाही पोलिसांचे सुरक्षा कडे असते. असे असताना नक्षल्यांची दहशत पसरल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देऊन दहशतमुक्त वातावरणात मजुरांना काम करता यावे अशी मागणी केली जात आहे.
सुरजागड पहाडावर नक्षल दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:26 PM
तालुक्यातील सुरजागड पहाडावर लॉयड्स मेटल्सकडून सुरू असलेल्या लोहखनिज खणन कामादरम्यान नक्षलवादी आल्याची माहिती कोणीतरी पसरविल्याने चांगलीच दहशत निर्माण झाली. त्यामुळे सोमवारी (दि.२६) येथील लोहखनिज वाहतुकीचे काम ठप्प पडले होते.
ठळक मुद्देलोहखनीज वाहतुकीवर परिणाम : अफवेमुळे उडाली घाबरगुंडी