शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

राष्ट्रपती दौऱ्यावर, आदिवासी विद्यार्थी वाऱ्यावर...

By संजय तिपाले | Published: June 30, 2023 4:33 PM

काँग्रेसचा रास्ता रोको : सूरजागड लोह प्रकल्पामुळे रस्त्याची दैना, बसेस बंदमुळे अडचण

गडचिरोली : राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी संपूर्ण प्रशासन जोमाने कामाला लागलेले असताना दुसरीकडे आदिवासी विद्यार्थी मात्र वाऱ्यावर आहेत. सूरजागड लोहखनिज वाहतुकीमुळे रस्त्याची दैना झाल्याने बसेस बंद आहेत, त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचा आरोप करुन काँग्रेसने ३० जूनला अहेरी तालुक्यातील सुभाषनगर येथे रास्ता रोको आंदोलन केले.

जिल्ह्यात ३० जूनपासून शाळा नियमितपणे सुरु झाल्या. आष्टी-आलापल्ली रस्त्यावर सूरजागड पहाडीवरील लोह खनिजाची बेसुमार वाहतूक सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या मार्गावरील एसटी बसेसच्या फेऱ्या महामंडळाने बंद केल्या आहेत. त्यामुळे बसने सवलतीत प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे. 

एसटी बसेस भंगार... छत गळतीमुळे प्रवासी त्रस्त, छत्री उघडून नागरिकांचा प्रवास

आदिवासी मुलांच्या उत्थानासाठी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाकरिता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ५ जुलैला गडचिरोलीत येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र, दुर्गम भागात आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यासंदर्भात तातडीने उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी ३० जूनला सुभाषनगर (ता.अहेरी) येथे काँग्रेसच्या वतीने विद्यार्थ्यांसह रस्त्यात ठिय्या देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान, तालुकाध्यक्ष डॉ. निसार हकीम, हरबा  मोरे, रजाक पठाण, राघोबा गौरकर, मधुकर शेडमेक, नामदेव आत्राम, हनीफ शेख, गणेश उप्पलवार, रुपेश बंदेला, दिनकर हुलके, बेबी  कुत्तरमारे यांच्यासह शेकडोच्या संख्येने विद्यार्थी, पालक आंदोलनात सहभागी झाले होते.

बस सुरु करण्याची मागणी 

आंदोलनस्थळी अहेरीचे तहसीलदार फारुख शेख, पोलिस निरीक्षक किशोर मानभाव, आगार व्यवस्थापक जितेंद्र राजवैद्य यांनी भेट दिली. आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी निवेदन देण्यात आले. सोमवारपासून नियमित बस सुरु करण्याचे आश्वासन आगार व्यवस्थापक जितेंद्र राजवैद्य यांनी दिले. त्यानंतर आंदाेलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :state transportएसटीDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूStudentविद्यार्थीGadchiroliगडचिरोलीagitationआंदोलन