लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या रूग्णालयात १८ व १९ जानेवारी या दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. या शिबिरात १४७ रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या मार्गदर्शनात डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे यांच्या देखरेखीत रोटरी क्लब नागपूर व महेंद्र अॅन्ड महेंद्र कंपनी नागपूर यांच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला नागपूर येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. रफत खान, लांबा, अभिनव बिश्वास, फतींद्र, समीर गाडे, अतुच्य कालमकर, तृप्ती शरद, मित्रा, ज्ञानेश्वर वायल, सशांक दर्रोवार, संदीप निखाडे, सईनानी, गिंजरा, सहिबा मेहनून, सुरभी चापरे, कल्पना दाते, इकबाल खान, अंजूम खान, सुरजीत हाजरा, राजू विलकीसन, पी. एस. गेडाम, अरविंद जोबलेकर, सुनील लांजेवार आदींनी शस्त्रक्रिया शिबिराला योगदान दिले आहे.शिबिरात मोतीबिंदू, जनरल सर्जरी, कार्बाईड युट्रेस, हर्निया, कॉल्ट्राकल्चर, लायपोमा, हायपोस्टेडी, ब्लाडरस्टोन, पॅराटाईड ट्युमर अशा अनेक प्रकारच्या रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या रूग्णांना पुढील सात दिवस लोकबिरादरी येथेच ठेवले जाणार आहे. या कालावधीत डॉ. दीगंत आमटे, डॉ. अनघा आमटे, डॉ. लोकेश तनगिरे, बबन पांचाळ, संध्या येम्पलवार, गणेश हिवरकर, जगदिश बुरूडकर, प्रकाश मायककार, शारदा ओक्सा, शारदा भसारकर, प्रमिला वाचामी, सविता मडावी, जुरी गावडे, शंकर गोटा, सुरेंद्र वेलादी, विनोद बानोत, शांता पोरतेट, माधुरी कोसरे, प्रियंका संगमवार, प्रेमिला मडावी, दीपमाला भगत हे सहकार्य करणार आहेत.या सेवाभावी उपक्रमाला मदत करण्यासाठी उत्तर प्रदेशातील डॉ. तृप्ती शरब, कोलकाता येथील डॉ. मंडल यांनी हजेरी लावली. ५०० शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तीन टप्प्यात शिबिर घेतले जाणार आहे, अशी माहिती डॉ. दिगंत आमटे यांनी दिली.ज्या शस्त्रक्रियांसाठी हजारो रूपयांचा खर्च आला असता. त्या शस्त्रक्रिया मोफत झाल्या. औषधोपचारही मोफतच करण्यात आला. पैशाअभावी आजपर्यंत वेदना सहन करणाऱ्या रूग्णांची शस्त्रक्रियेनंतर सुटका झाली. त्यामुळे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांवर समाधान दिसून येत होते.
लोकबिरादरी येथे १४७ रूग्णांवर शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:32 AM
हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या रूग्णालयात १८ व १९ जानेवारी या दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. या शिबिरात १४७ रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
ठळक मुद्देमोफत औषधोपचार : तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूची हजेरी