शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

८ लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल महिला माओवाद्याचे आत्मसमर्पण

By संजय तिपाले | Published: July 27, 2024 5:12 PM

खून, चकमकीत सहभाग : कमांडर पदावर होती सक्रिय

गडचिरोली: माओवाद्यांना सर्व प्रकारचे साहित्य पुरवठा करणारी जहाल माओवादी व कमांडर रिना बोर्रा नरोटे उर्फ ललिता (३६,रा.बोटनफुंडी ता. भामरागड) हिने २७ जुलै रोजी जिल्हा पोलिस व राज्य राखीव पोलिस दलापुढे आत्मसमर्पण केले. तिच्यावर शासनाचे आठ लाखांचे बक्षीस होते. रिना नरोटे ही २००६ मध्ये पेरमिली दलममध्ये भरती झाली होती. २००७ पासून ती पुरवठा टीममध्ये काम करायची. २००७ ते २००८  मध्ये शिवणकला, कापड कटींग व शिलाई यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण तिने घेतले. २००८ ते २०१४ या दरम्यान टेलरिंग टीममध्ये सदस्य पदावर ती कार्यरत होती. २०१४ मध्ये टेलर टीममध्ये कमांडर पदावर तिची बढती झाली. 

कार्यकाळात तिच्यावर चकमक व खुनाचा गुन्हा नोंद आहे. २०२० मध्ये  पेरमिली भट्टी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. त्याआधी २०१९ मध्ये  नैनवाडी जंगल परिसरात एका निरपराध व्यक्तीच्या खुनात ती सामील होती. विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ बटालियन ९ चे कमांडंट शंभू कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आत्मसपर्मण पार पडले.

साडेपाच लाखांचे बक्षीस मिळणाररिना नरोटे या महिला माओवाद्याच्या अटकेवर आठ लाखांचे शासनाचे बक्षीस होते. आत्मसमर्पणानंतर आता तिला साडेपाच लाखांचे बक्षीस मिळणार आहे. २०२२ पासून आतापर्यंत  एकूण २३ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली