लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील धान पिकावर तुडतुडा, मावा, कडाकरपा यासह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकºयांचे पीक नष्ट झाले. सदर पिकाचे सर्वेक्षण करण्याची मागणी तालुक्यातील शेतकºयांकडून झाली. या मागणीची दखल घेत महसूल व कृषी विभागाने सर्वेक्षणास प्रारंभ केला. आरमोरी परिसरात आरमोरी साझाचे तलाठी कोकोडे व कृषी सहायक व्ही. आर. वाढई यांनी शेतीला भेट देऊन सर्वेक्षण केले व पंचनामा केला.तालुक्यातील धान पीक विविध रोगांच्या कचाट्यात सापडल्यानंतर शेतकºयांनी अनेकदा फवारणी करूनही उपयोग झाला नाही. महागडी कीटकनाशके शेतकºयांनी फवारली तरीसुद्धा धान पिकाची तणीस झाली. रोगग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करण्याची मागणी झाल्यानंतर तलाठी कोकोडे व कृषी सहायक वाढई यांनी सर्वेक्षण केले. यावेळी देवानंद दुमाने, मुकुंदा ठाकरे, रामा ठाकरे, पंढरी कांबळे, राजू भानारकर उपस्थित होते. विशेष म्हणजे मागील वर्षीही अशाच प्रकारे सर्वेक्षण महसूल विभागामार्फत करण्यात आले. तरीसुद्धा आर्थिक मदत मिळाली नाही.नुकसानग्रस्तांना मदत द्या- भाजपआरमोरी तालुक्यात विविध रोगांमुळे उभ्या धान पिकाची तणीस झाली. त्यामुळे या रोगग्रस्त पिकाची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपच्यावतीने करण्यात आली. निवेदन देताना श्रीहरी कोपुलवार, तालुका अध्यक्ष नंदू पेटवार, दीपक निंबेकर, पंकज खरवडे, मनोज मने, प्रीतम जांभुळे, जितेंद्र ठाकरे, गुरुदेव ढोरे, महिला तालुकाध्यक्षा डॉ. संगीता रेवतकर, रोशनी बैस, राकेश बैस, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष नंदूभाऊ नाकतोडे, स्वप्नील धात्रक, गोलू बावरे, संजय सोनटक्के आदी उपस्थित होते.
आरमोरी परिसरातील रोगग्रस्त धानाचा यंत्रणेकडून सर्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:29 AM
तालुक्यातील धान पिकावर तुडतुडा, मावा, कडाकरपा यासह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकºयांचे पीक नष्ट झाले. सदर पिकाचे सर्वेक्षण करण्याची मागणी तालुक्यातील शेतकºयांकडून झाली.
ठळक मुद्देपिकाची पाहणी : तलाठ्यांसह कृषी सहायक पोहोचले बांधावर