शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

रेतीघाट लिलाव प्रक्रियेला स्थगिती

By admin | Published: October 29, 2015 1:55 AM

जिल्हा प्रशासनाच्या वतीने २०१५-१६ या वर्षात जिल्ह्यातील एकूण ६८ योग्य रेतीघाट लिलावासाठी पात्र ठरविण्यात आले होते.

उच्च न्यायालयाचे आदेश : ६८ घाटांचा होणार होता लिलावगडचिरोली : जिल्हा प्रशासनाच्या वतीने २०१५-१६ या वर्षात जिल्ह्यातील एकूण ६८ योग्य रेतीघाट लिलावासाठी पात्र ठरविण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने सदर लिलाव प्रक्रिया राबविण्यासाठी हालचाली सुरू केल्या. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या लिलाव प्रक्रियेला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रेती घाटांची लिलाव प्रक्रिया तुर्तास रखडली आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तालुकास्तरावरील महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी रेती घाट पात्र ठरविण्यापूर्वी संपूर्ण रेती घाटाची पाहणी करतात. त्यानंतर कोणता रेती घाट उपश्याकरिता योग्य आहे याची यादी जिल्हा प्रशासनाकडे सादर करतात. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर सदर रेती घाटांची मंजुरी मिळविण्यासाठी तसा प्रस्ताव राज्याच्या पर्यावरण विभागाकडे पाठविला जातो. जिल्हा प्रशासनाने २०१५-१६ वर्षासाठी जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील एकूण ६८ रेतीघाट योग्य ठरविले आहेत. यामध्ये सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवरील मुकडीगुड्डा, मद्दीकुंठा, प्राणहिता नदीवरील टेकडाताला, अहेरी तालुक्यातील प्राणहिता नदीवरील महागाव बु., वांगेपल्ली, चिचगुंड्डी या रेती घाटांचा समावेश आहे. एटापल्ली तालुक्यातील बांडे नदीवरील आलदंडी, सेवारी, भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीवरील भामरागड, मुलचेरा तालुक्यातील येल्ला, चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीवरील मुधोली, गणपूर रै., इल्लुर, तळोधी मो., दोटकुली, मोहोर्ली मो., एकोडी, कुरूड, जोगना, घारगाव, पारडी देव व मुरमुरी आदी १२ रेती घाटांचा समावेश आहे. धानोरा तालुक्यातील बांधोना चिचोली, गडचिरोली तालुक्यातील खुर्सा-कुरखेडा, कठाणी नदी घाट, खरपुंडी, आंबेशिवनी, कनेरी, पारडीकुपी, साखरा, राखी, शिवणी, पुलखल, विहीरगाव व बोदली माल आदी १३ घाटांचा समावेश आहे. देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा, आमगाव, सावंगी, विर्शीतुकूम, विसोरा, कोकडी, कोंढाळा मेंढा आदी ८ रेती घाटांचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील मंजूर करण्यात आलेल्या रेती घाटांमध्ये वैरागड-विहीरगाव, वैरागड-कोरपना, हिरापूर रिठ, मेंढा, मांगदा, अरसोडा, वघाळा, किटाळी, डोंगरसावंगी, डोंगरगाव भु., रामपूर चक, शिवणी बु., सायगाव व कुलकुली आदी १५ रेती घाटांचा समावेश आहे. कुरखेडा तालुक्यातील सहा रेती घाट लिलाव प्रक्रियेसाठी मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये सती नदीवरील मोहगाव, घाटी, कुरखेडा-कुंभीटोला, कुरखेडा, पुराडा व मालेवाडा आदी रेती घाटांचा समावेश आहे. (स्थानिक प्रतिनिधी)गडचिरोली जिल्ह्यात सन २०१५-१६ या वर्षाकरिता ६८ रेती घाटांची लिलाव प्रक्रिया राबवायची होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेती घाट लिलाव प्रक्रियेला २७ आॅक्टोबर रोजी मंगळवारी पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिलेली आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी.- ओंकारसिंग भौंड, जिल्हा खनिकर्म अधिकारी,जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली