शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

आरमोरी बाजार समितीवर सावकार गटाचा झेंडा

By admin | Published: May 09, 2017 12:45 AM

जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठेची व महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत...

शहरातून काढली विजयी रॅली : सावकार गटाचे १८ पैकी १७ सदस्य विजयीलोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठेची व महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या सावकार गटाने १८ पैकी १७ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले आहे. विरोधी असलेल्या शेतकरी संघर्ष पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक १७ मे रोजी पार पडली. या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या वडसा, कुरखेडा, कोरची या तालुक्यातील १० मतदान केंद्रांवर निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. त्यामुळे आरमोरी तालुक्यात चार केंद्र, देसाईगंज तालुक्यात दोन केंद्र, कुरखेडा तालुक्यात तीन केंद्र व कोरची तालुक्यातील एका केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पार पडली. विजयी उमेदवारांमध्ये सेवा सहकारी मतदार संघ, सर्वसाधारण गटातून सहकार पॅनलचे हरिशचंद्र डोंगरवार, दोषहर फाये, खेमराज हुलके, रामसुराम काटेंगे, व्यंकटी नागीलवार, ईश्वरी पासेवार, देवाजी पिल्लारे हे उमेदवार विजयी झाले आहेत. ओबीसी गटातून खिरसागर नाकाडे अविरोध निवडून आले आहेत. महिला गटातून कलावती कानतोडे, ललीता टिकले या विजयी झाल्या आहेत. विमुक्त व भटक्या जाती गटातून रत्नाकर धाईत विजयी झाल्या आहेत. ग्राम पंचायत मतदार संघातील सर्वसाधरण गटातून विनोद खुणे, कैलास राणे, दुर्बल घटकातून मुखरू वाघाडे, अनुसूचित जाती, जमाती गटातून पुष्पलता मासरकर, व्यापारी अडते मतदार संघातून गुरूमुखदास नागदेवे, हैदरभाई पंजवानी विजयी झाले आहेत. हे सर्व उमेदवार सहकार पॅनलचे आहेत. शेतकरी संघर्ष पॅनलचे उमेदवार असलेले हमाल मापारी मतदार संघाचे नवलाजी ठाकरे हे एकमेव उमेदवार विजयी झाले आहेत. सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघातून शेतकरी संघर्ष पॅनलचे उमेदवार उमाशंकर ग्यानबा हारगुळे, ईश्वर सखाराम खोडवे, आसाराम विठोबा प्रधान, विठ्ठलराव शेंडे, नरेश टिकाराम टेंभूर्णे, सहकारी संस्था महिला मतदार संघातून सरस्वती साधो कांबळी, भटक्या विमुक्त जाती, जमातीमधून राजेंद्र नक्टू दिघोरे, ग्राम पंचायत संघातून दादाजी तुकाराम भर्रे, चंदू पांडुरंग गरफडे, तुलाराम चैताराम मडावी, सुजीत मिस्त्री, कवडू लक्ष्मण सहारे, ग्राम पंचायत अनुसूचित जमाती मतदार संघातून नाजूक वट्टी पराभूत झाले आहेत. व्यापारी अडते गटातील माजी आ. डॉ. रामकृष्ण मडावी, विलास दादाजी ठेंगरी पराभूत झाले आहेत. हमाल मापारी तोलारी संघातून सावकार गटाचे दौलत रामकृष्ण ठाकरे पराभूत झाले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार भवनात मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक सहकारी संस्था गडचिरोलीचे नितीन मस्के यांनी काम पाहिले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुशील वानखेडे, पर्यवेक्षक गोपाल वेलेकर यांनी सहकार्य केले. निकालानंतर विजयी रॅली काढण्यात आली. प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या निवासस्थानी बाजार समितीचे नवनियुक्त सदस्य व जिल्हा परिषद सदस्य यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, आ. क्रिष्णा गजबे, जि. प. सदस्य संपत आळे, रमाकांत ठेंगरी, मित्तलेश्वरी खोब्रागडे, नाजूक पुराम, भाग्यवान टेकाम, सदाराम नरोटे, देसाईगंजचे सभापती मोहन गायकवाड, रोशनी पारधी, अशोक नलेश्वर, धानोरा पं. स. सभापती अजमन राऊत उपस्थित होते. यावेळी अरविंद पोरेड्डीवार यांनी मार्गदर्शन केले.