विष्णू दुनेदार ।लोकमत न्यूज नेटवर्कतुळशी : कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी कडूच! अशी म्हण प्रसिद्ध आहे. आशिया, आफ्रिका, उष्ण कटिबंध प्रदेशात घेतले जाणारे वेलवर्गीय पिक आहे. देसाईगंज तालुक्यातील तुळशी, किन्हाळा, मोहटोला, अरततोंडी, पोटगाव, विहिरगाव, चिखली, डोंगरगाव, कुरुड, नैनपूर, विसोरा, एकलपूर येथे मोठ्या प्रमाणात कारल्याचे उत्पादन घेतले जात असून शेतकऱ्यांना मोठी आर्थिक प्राप्ती होत आहे. त्यामुळे शेतकरी या पिकाकडे वळले असून कडू कारले शेतकºयांना आर्थिक समृध्दीचा गोडवा देत असल्याचे चित्र आहे.धानाच्या पिकासाठी उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात लागत असते. त्या तुलनेने फायदा अत्यल्प होत असल्याने देसाईगंज तालुक्यातील शेतकरी वर्ग भाजीपाला पिकाचे उत्पादन घेण्याकडे वळले आहेत. त्यात कारले उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत आहे. कारले पिकासाठी धान पिकापेक्षा कमी पाणी, कमी उत्पादन खर्च लागत असल्याने शेतकºयांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊन आर्थिक समृध्दी येत आहे. एक एकर शेतीतून अडीच ते तीन लाख रूपयाचे उत्पन्न प्राप्त होत आहे.यासाठी व्हीएनआर या जातीच्या कारलेची लागवड केल्या जात आहे. कारल्यासाठी नागपूरला मोठी बाजारपेठ असून देसाईगंज येथून दररोज देसाईगंज परिसरातील शेतकरी नागपूर येथे कारले पाठवतात. हे कारले नागपूरचे व्यापारी विदेशात पाठवतात. त्यामुळे कारल्यांना चांगला भाव मिळत आहे. यावर्षी शेतकºयांना ३५ रुपयापासून २५ रुपयापर्यंत प्रती किलो भाव मिळाल्याने शेतकºयांना आर्थिक फायदा मिळत आहे. तुळशी येथील शेतकरी मोरेश्वर दुनेदार, सोमेश्वर सुकारे होमराज कुत्तरमारे, सोमेश्वर दुनेदार, भाष्कर मारबते, अंबरनाथ दुनेदार, भाष्कर तोंडफोडे, मुरलीधर दुनेदार, गुलाब तोंडफोडे, दिनकर सुकारे, हिरालाल तोंडफोडे, गिरीधर सुकारे, प्रकाश पत्रे, नेताजी सुकारे, देवराव सुकारे, देवदास ठाकरे, मदन सुकारे, मेघराज सुकारे, हिरामण ठाकरे, कविश्वर दुनेदार, काशीनाथ ठाकरे, मोहन दुनेदार, राकेश ढोरे, श्रीराम लोणारे, बबन पत्रे यांनी यावर्षी कारले पिकाची लागवड केली.वांगे व टमाटरचेही भरघोस उत्पादनदेसाईगंज तालुक्याच्या तुळशी, कोकडी परिसरात अनेक शेतकºयांनी सिंचन विहीर, मोटारपंपची व्यवस्था केल्याने दुबार पीक अनेक शेतकरी घेत आहेत. सिंचन सुविधा निर्माण झाल्यामुळे या भागात अनेक शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले आहेत. प्रामुख्याने टमाटर, वांगे यांच्यासह पालेभाज्यांचेही उत्पादन येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहेत.
कडू कारले शेतकऱ्यांना देताहेत आर्थिक समृद्धीचा गोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 11:22 PM
कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी कडूच! अशी म्हण प्रसिद्ध आहे. आशिया, आफ्रिका, उष्ण कटिबंध प्रदेशात घेतले जाणारे वेलवर्गीय पिक आहे. देसाईगंज तालुक्यातील तुळशी, किन्हाळा, मोहटोला, अरततोंडी, पोटगाव, विहिरगाव, चिखली, डोंगरगाव, कुरुड, नैनपूर, विसोरा, एकलपूर येथे मोठ्या प्रमाणात कारल्याचे उत्पादन घेतले जात असून शेतकऱ्यांना मोठी आर्थिक प्राप्ती होत आहे.
ठळक मुद्देसंडे अँकर । एकरी अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न; देसाईगंजवरून नागपूरच्या बाजारपेठेत जाताहेत कारले