लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सीआरपीएफ १९२ बटालियनच्या जवानांना जलसंरक्षणाची शपथ देण्यात आली. तसेच कॅम्प परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.यावेळी सीआरपीएफ बटालियनचे कमांडंट जिजाऊ सिंह, द्वितीय कमान अधिकारी दीपककुमार साहू, उपकमांडंट संध्या राणी, वेदपाल सिंह, चिकित्सा अधिकारी डॉ.रवीकिरण दिघाडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. पाण्याच्या वाढत्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात भूजलाचा उपसा केला जात आहे. त्यामुळे भूजल पातळीत कमालीची घट झाली आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जलसंधारण व वृक्षांचे महत्त्व जवानांना कळावे, या उद्देशाने सीआरपीएफतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच जलसंरक्षण करण्याविषयी शपथ देण्यात आली. जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळतानाच त्यांच्यामध्ये सामाजिक भावना रूजावी, या उद्देशाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी मार्गदर्शन करताना कमांडंट जिजाऊ सिंह यांनी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. देशाची सुरक्षा करतानाच पर्यावरण व सामाजिक जबाबदारी पार पाडणे हे प्रत्येक जवानाचे कर्तव्य आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी उपस्थित अन्य अधिकाऱ्यांनी सुद्धा सीआरपीएफ जवानांना मार्गदर्शन केले.
जवानांना जलसंरक्षणाची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 12:25 AM
सीआरपीएफ १९२ बटालियनच्या जवानांना जलसंरक्षणाची शपथ देण्यात आली. तसेच कॅम्प परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी सीआरपीएफ बटालियनचे कमांडंट जिजाऊ सिंह, द्वितीय कमान अधिकारी दीपककुमार साहू, उपकमांडंट संध्या राणी, वेदपाल सिंह, चिकित्सा अधिकारी डॉ.रवीकिरण दिघाडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
ठळक मुद्देकॅम्प परिसरात वृक्षारोपण : सीआरपीएफ १९२ बटालियनचा उपक्रम