लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पोर्लापासून सहा किमी अंतर असलेल्या देलोडा परिसरात वाघाचे दर्शन काही नागरिकांना झाले आहे. त्यामुळे नागरिक भयभित झाले आहेत. वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.पोर्ला ते देलोडा गावापर्यंत घनदाट जंगल आहे. देलोडाच्या पलिकडे अनेक गावे आहेत. या गावातील नागरिकांना याच रस्त्याने जावे लागते. मात्र देलोडा परिसरात अधूनमधून वाघाचे दर्शन होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही देलोडा परिसरात वाघाने दहशत निर्माण केली होती. देलोडा येथील शेतकऱ्यांचे बैल ठार केले होते. पुन्हा वाघाने बस्तान मांडल्याने जीवितहानी होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पोर्ला ते देलोडा मार्गावरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ राहते. वाहनधारकावरही हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शक्य तितक्या लवकर वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
देलोडा परिसरात वाघाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 10:15 PM
पोर्लापासून सहा किमी अंतर असलेल्या देलोडा परिसरात वाघाचे दर्शन काही नागरिकांना झाले आहे. त्यामुळे नागरिक भयभित झाले आहेत. वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.
ठळक मुद्देअनेकांना दर्शन : बंदोबस्ताची मागणी