लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहाची तोडफोड करणाऱ्या आरोपीला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी स्थानिक प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांमार्फत पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर अज्ञात इसमांनी तोडफोड व नासधूस करून निंदणीय कृत्य केले आहे. हा भ्याड हल्ला असून या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. स्थानिक इंदिरा गांधी चौकात या प्रकरणाचा निषेध नोंदविण्यात आला. याप्रसंगी ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष विनायक झरकर, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, राकाँ महिला जिल्हाध्यक्ष सोनाली पुण्यपवार, जिल्हा सरचिटणीस जगन जांभुळकर, जिल्हा सचिव संजय कोचे, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुस्ताक शेख, विवेक बाबनवाडे, मलय्या कालवा, विजय धकाते, अशोक बोटरे, अंकूश मामीडवार, मनीषा खेवले, तत्वशील खोब्रागडे, जुगनू पटवा, कबीर शेख, भास्कर नैैताम उपस्थित होते.आरमोरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळाच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून राजगृहावरील हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच सदर ऐतिहासिक वास्तूला शासनाकडून २४ तास सुरक्षा द्यावी, आरोपीला लवकर अटक करून कठोर कारवाई करावी व यापुढे असे प्रकार घडणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, अशी मागणीही केली. निवेदन देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळाचे अध्यक्ष यशवंत जांभुळकर, सचिव किशोर सहारे, धर्मा बांबोळे, गणपत शेंडे, दिवाकर रामटेके, पुंडलिक इंदूरकर, ताराचंद बन्सोड उपस्थित होते.चामोर्शी येथे समाज बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. जागतिक वारसा असलेल्या ऐतिहासिक वास्तूवर हल्ला करणे ही बाब अत्यंत गंभीर व निंदणीय आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना अॅड. बोधी रामटेके, जी. पी. गोंगले, नगरसेवक सुमेध तुरे, अभिषेक दुर्गे, यू. व्ही. ढोके, श्याम रामटेके, सुनील तुरे, हनुमंत डंबारे, भाऊराव खोब्रागडे, आदित्य तुरे, देवानंद उराडे व कार्यकर्ते उपस्थित होते.अहेरी येथे नागरिकांच्या वतीने तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन पाठवून राजगृहावरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. निवेदन देताना सुरेंद्र अलोणे, महेश अलोणे, राहूल गर्गम, कपिल ढोलगे, अमोल अलोणे, प्रशांत भिमटे, चेतन अलोणे, किशोर सुनतकर, नभीत ढोलगे, कार्तिक निमसरकार, विजय सुनतकर व नागरिक उपस्थित होते.
राजगृहावरील हल्लेखोरांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 5:00 AM
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर अज्ञात इसमांनी तोडफोड व नासधूस करून निंदणीय कृत्य केले आहे. हा भ्याड हल्ला असून या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. स्थानिक इंदिरा गांधी चौकात या प्रकरणाचा निषेध नोंदविण्यात आला.
ठळक मुद्देपक्ष व संघटनांची मागणी : गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, अहेरी येथे प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन