सुरजागडे दाम्पत्याची मागणी : पोटेगाव पोलिसांनी तक्रार घेतली नाहीगडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील नवरगाव येथील ढिवरू सुकरू गेडाम व ताराबाई ढिवरू गेडाम या पती-पत्नींनी क्षुल्लक कारणावरून वाद घालून आपल्याला मारहाण केली. या घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी पोटेगाव पोलीस मदत केंद्रात गेलो असता, तेथील पोलिसांनी तक्रार घेतली नाही. मारहाण करणाऱ्यावर व कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नवरगाव येथील ज्योती सुरजागडे व शत्रुघ्न सुरजागडे यांनी बुधवारी गडचिरोली आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी माहिती देताना सुरजागडे दाम्पत्यांनी सांगितले की, १२ आॅक्टोबर रोजी घराशेजारी राहणारा ढिवरू सुकरू गेडाम याने पेरूच्या झाडाची पाने आमच्या अंगणात पडली, असा मुद्दा उपस्थित करून अश्लील शिवीगाळ केली, तसेच मारहाण केली. या घटनेची तक्रार न घेता पोटेगाव पोलिसांनी गेडाम दाम्पत्यांशी समझोता करण्याचा सल्ला दिला. समजोता न केल्यास आमच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, असे सुरजागडे यांनी सांगितले.
मारहाण करणाऱ्यावर कारवाई करा
By admin | Published: October 15, 2015 1:39 AM