गडचिरोली : गडचिरोली शहरात पुढारी, मंत्री यांचे आगमन, विविध धार्मिक, सामाजिक उत्सव यानिमित्ताने मुख्य इंदिरा गांधी चौकात फटाके फोडले जातात. मात्र त्यानंतर कित्येक दिवस त्या फटाक्याचा कचरा चौकातील वर्तुळाकार खड्ड्यात पडून राहतो. रस्त्यावरही तो उडतो. कचरा उचलण्याची जबाबदारी फटाके फोडणारे घेत नाही. त्यामुळे अशा फटाके फोडणाऱ्यांवर नगर परिषद प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक संस्थांनी केली आहे. देशात केंद्र सरकारच्या माध्यमातून स्वच्छतेचा मंत्र दिला जात आहे. स्वच्छता अभियानात अनेक लोक सहभागी होत आहे, असे असताना फटाके फोडून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई पालिका प्रशासनाने करावी व त्यांच्याकडून करण्यात आलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून घ्यावी, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)
मुख्य रस्त्यांवर फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करा
By admin | Published: March 30, 2015 1:24 AM