लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अवैध दारू विक्रेत्यांवर मागील तीन महिन्यात पोलीस विभागाच्या वतीने किती कारवाया करण्यात आल्या याचा आढावा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घेतला.या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, मुक्तीपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर आदी उपस्थित होते. फेब्रुवारी महिन्यात मुक्तीपथ व पोलीस विभाग यांची संयुक्त बैठक पार पडली. त्यावेळी अतिशय जास्त प्रमाणात दारू विक्री करणाऱ्या गावांची यादी मुक्तीपथने पोलीस विभागाला दिली होती. त्यापैकी कोणत्या गावांमध्ये कारवाया करण्यात आल्या. दारू विक्रीचे प्रमाण कमी झाले काय? याशिवाय कोणत्या मोठ्या दारू विक्रेत्यांवर कारवाई झाली आहे, याबाबतचा आढावा घेण्यात आला. दारू विक्री थांबविण्यासाठी दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. तालुका स्थळी व शहरी भागातील दारू विक्री कशी कमी करता येईल, यासाठी प्रयत्न करावा. त्याचबरोबर दारू पिऊन वाहन चालविणाºयांना ब्रेथ अॅनलायझरचा वापर करून कारवाई करण्याचे निर्देश दिले. काही तालुक्यात दारू विक्रेत्यांवर कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे दारू विक्री कमी झाली आहे, असे निरिक्षण मुक्तीपथच्या तालुका संघटकांनी व्यक्त केले.
अवैध दारू विक्रीवरील कारवाईचा घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:13 PM
अवैध दारू विक्रेत्यांवर मागील तीन महिन्यात पोलीस विभागाच्या वतीने किती कारवाया करण्यात आल्या याचा आढावा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घेतला. या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, मुक्तीपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर आदी उपस्थित होते.
ठळक मुद्देविक्री घटल्याचा निष्कर्ष : मुक्तीपथ व पोलीस विभागाची बैठक