लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या आठवड्यात पोलीसांच्या कारवाईत ४० नक्षली ठार झाले. पोलीसांच्या या ऐतिहासीक कामगिरीची संपूर्ण देशाने प्रशंसा केली. तसेच सदर कारवाई पार पडलेल्या जवानांचे सर्वत्र कौतूक होत असतांना नक्षल्यांचा पुळका घेत पोलीसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करीत नक्षलींचे समर्थन करीत सत्यशोधन समितीने पोलीसांच्या कारवाईवर शंका उपस्थित केली. नक्षल्यांकडून आदिवासींची हत्या होत असताना स्वत:ला मानवाधिकारवादी म्हणविणाऱ्या संघटना कुठे जातात? असा थेट सवाल करीत सत्यशोधन समितीच्या नावाने काम करणाऱ्या नक्षल समर्थक संघटनावर कारवाई करावी, अशी मागणी भूमकाल संघटनेचे अध्यक्ष डॉ. अरविंद सोवनी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेतून केली.यावेळी पत्रकार परिषदेला भूमकाल संघटनेचे सचिव प्रा. श्रीकांत भोवते, सदस्य अविनाश सोवनी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. अरविंद सोवनी म्हणाले की, देशात प्रत्येक तासाला नक्षलवादी घटना होतात. आजपर्यंत हजारो सामान्य लोकांना शुल्लक कारणासाठी केवळ शंकेच्या आधारावर मारले जाते. महाराष्ट्रात गडचिरोली ४०७ आदिवासी, २५ दलित, २४ बंगाली तसेच ४० इतर नागरीकांच्या हत्या नक्षलवाद्यांकडून करण्यात आल्या. अनेक आदिवासींच्या नक्षल्यांनी निर्घृणपणे हत्या केलेल्या आहेत. आजपर्यंत अधिकतर हत्या केवळ पोलीस खबरी असल्याच्या कारणावरुन करण्यात आल्या. यातील ९५ टक्के लोक पोलीस खबरी नसल्याचे निष्पन्न झाले आहे. नक्षलवादी नि:ष्पाप आदिवासी, गैरआदिवासींचे बळी घेत असतांना सत्यशोधन समितीचे दलित आदिवासी प्रेम कुठे जाते? सामान्य जनतेला न्याय मिळावा यासाठी अशा सीपीडीआर, सीडीआरओ, सीएलसी, आयएपीएल आदी मानवाधिकारवादी संघटना कुठे जातात असा थेट सवाल त्यांनी यावेळी केला. एरव्ही नक्षलवाद्यांकडून होणारी जाळपोळ, निरागस आदिवासींची होणारी हत्या, पोलीस जवानांचे घेतलेले बळी याविरुद्ध या मानवाधिकारवादी संघटनेने कधीच सत्यशोधन केलेले नाही. नक्षल भागातील समस्यांवर काम करण्याचा दावा करणाºया या संघटनांनी नक्षलवाद्यांनी ज्या विकासकामांविरुद्ध जाळपोळ करुन मजुरांना मारले अशा घटनेविरोधात प्रश्न का उपस्थित केला नाही?या संघटना राष्ट्रविरोधी भावना लोकांमध्ये वाढीसाठी काम करीत असतात. त्यामुळे अशा संघटनांवर कायमची बंदी घालून संघटनेच्या लोकांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी डॉ. अरविंद सोवनी यांनी लावून धरली.सत्यशोधन समितीचा काढता पाय२२ व २३ एप्रिल रोजी पोलीस व नक्षल यांच्या चकमकीबाबत मानवाधिकाराचे कसे हनन झाले आहे, याची माहिती सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानंतर भूमकाल संघटनेचे डॉ. अरविंद सोवणी व त्यांचे श्रीकांत भोवते व अविनाश सोवनी त्या ठिकाणी पोहोचले. चकमकी संदर्भात खुली चर्चा करण्याचे आवाहन डॉ. अरविंद सोवनी यांनी केले असता, सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी काढता पाय घेत चर्चा करण्याचे टाळले.
नक्षलवादाचे समर्थन करणाऱ्या संघटनांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 11:44 PM
गेल्या आठवड्यात पोलीसांच्या कारवाईत ४० नक्षली ठार झाले. पोलीसांच्या या ऐतिहासीक कामगिरीची संपूर्ण देशाने प्रशंसा केली. तसेच सदर कारवाई पार पडलेल्या जवानांचे सर्वत्र कौतूक होत असतांना नक्षल्यांचा पुळका घेत पोलीसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करीत नक्षलींचे समर्थन करीत सत्यशोधन समितीने पोलीसांच्या कारवाईवर शंका उपस्थित केली.
ठळक मुद्देभूमकाल संघटनेची पत्रकार परिषदेत मागणी : निष्पापांचा बळी जातो त्यावेळी का केले जात नाही सत्यशोधन?