शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
3
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
4
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
6
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
7
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
8
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
9
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...
10
"भाजप विरोधी होणे गुन्हा आहे का? आम्ही त्यालाच मतदान करणार जो..."; अविमुक्तेश्वरानंद महाराष्ट्रात कुणासोबत?
11
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
12
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?
13
मोठी बातमी: भाजपच्या दोन बड्या नेत्यांची मुले शिवसेनेच्या तिकिटावर लढणार?; शिंदेभेटीमुळे भुवया उंचावल्या
14
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महायुती विरुद्ध मविआ; मराठवाडा सत्तेची समीकरणं बदलणार?
15
प्रेरणादायी! ४ वेळा नापास, परीक्षेच्या आदल्या रात्री पॅनिक अटॅक; UPSC क्रॅक करून केली कमाल
16
महाराष्ट्र निवडणुकीत संघानं बनवली रणनीती; कोणकोणत्या मुद्द्यांवर करणार प्रचार?
17
राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार, कारण...; मध्य प्रदेशचं उदाहरण देत पडळकरांनी सांगितलं गणित
18
कुठे हसू तर कुठे अश्रू! न्यूझीलंडच्या महिला चॅम्पियन; आफ्रिकेच्या पोरींच्याही पदरी निराशा Photos
19
"हा माझा चॉईस नव्हता, पण..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री?, आता केला मोठा खुलासा
20
उद्धव ठाकरे-भाजपा पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी एका वाक्यातच पाणउतारा केला

पोलिसांवर कारवाई करा

By admin | Published: June 20, 2016 1:15 AM

चंदनवेली गावातील सहा महिला बचत गटांच्या संयुक्त विद्यमाने गावातीलच दोन महिला दारू विक्रेत्यांच्या घरी धाड टाकून त्यांच्याकडून पकडलेली

एटापल्ली : चंदनवेली गावातील सहा महिला बचत गटांच्या संयुक्त विद्यमाने गावातीलच दोन महिला दारू विक्रेत्यांच्या घरी धाड टाकून त्यांच्याकडून पकडलेली दारू १७ जून रोजी दुपारी १२.३० वाजता पोलिसांच्या स्वाधीन करण्याच्या तयारीत असताना बोलेपल्ली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक गावंडे हे ८ ते १० कर्मचाऱ्यांसह चंदनवेली गावात आले व त्यांनी बचत गटाच्या महिलांना अर्वाच्य व जातीवाचक शिवीगाळ केली व अवैध दारूविक्रेत्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यासह दारूविक्रेत्या महिलांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बचत गटाच्या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तहसीलदारांमार्फत पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. चंदनवेली येथील सहा बचत गटाच्या महिलांनी वर्षा मेश्राम हिच्या घरून दोन निपा विदेशी दारू व नंदा भांडेकर हिच्या घरून दोन निपा विदेश दारू पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्याची तयारी चालविली होती. परंतु यादरम्यान सहायक पोलीस उपनिरीक्षक गावंडे ८ ते १० कर्मचाऱ्यांसह गावात आले व त्यांनी महिलांचे काहीही ऐकून घेतले नाही व महिलांना शिवीगाळ केली. दुसऱ्याच्या घरी शिरून तुम्हाला दारू पकडण्याचा अधिकार कुणी दिला, असे बोलून अंगावर धावून आले व बचत गटाच्या महिलांनाच जैलमध्ये टाकण्याची धमकी दिली, असा आरोप महिलांनी केला. निवेदन देताना जानोबाई तेलामी, रूक्मीबाई तेलामी व बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)