कृष्णा कोडापे यांनी निवेदनात म्हटले आहे की, माझा मुलगा किशोर कृष्णा कोडापे (वय २३) हा राजेंद्र छाबडा यांच्या कंस्ट्रक्शन कंपनीकडून सुरू असलेल्या बंधाऱ्याच्या कामावर जात हाेता. आमगाव येथील कंत्राटदार शंकर नायडू हे त्याला घेऊन गेले हाेते. ११ जून २०२१ ला नेहमीप्रमाणे कुरखेडा तालुक्याच्या जांभळी (कढाेली) येथील खुशाल काशीनाथ वाघ यांच्या शेत परिसरात काम सुरू हाेते. शेतकरी वाघ यांनी आपल्या शेतात वन्यजीव मारण्यासाठी उच्चदाब विद्युत प्रवाह अनेक दिवसांपासून लावून ठेवला हाेता. याच दिवशी दुपारी १ वाजता जेवणापूर्वी किशोर हा सावलीचा आधार घेण्यासाठी वाघ यांच्या शेतात गेला असता त्याच्या पायाला जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाला. यात किशाेरचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक चाैकशीनंतरही कुरखेडा पाेलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. तसेच माेका पंचानाम्यातील बयाण्यांमध्ये बरीच तफावत दिसून येत आहे. तो शेतकरी पीक नसतानाही नेहमीच शेतात जिवंत विद्युत प्रवाह साेडून ठेवताे. त्यामुळे वन्यप्राणी व मानवालाही धाेका आहे. परंतु, त्याच्यावर कारवाई करण्याकडे वनविभाग दुर्लक्ष करीत आहे. माझ्या मुलाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या लाेकांवर कठाेर कारवाई करून कुटुंबाला न्याय द्यावा व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मृत किशाेरचे वडील कृणा कोडापे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
किशाेरच्या मृत्यूस जबाबदार लाेकांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 4:39 AM