शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
एकनाथ शिंदेंनी दावा सोडला, देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता; मनोज जरांगेंचा थेट इशारा
3
Pune: लिव्ह इन पार्टनरला संपवलं, मुलाला सोडलं आळंदीत; पुण्यातील भयंकर घटनेची Inside Story
4
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
5
मविआ फुटणार, पालिकेत ठाकरे गट स्वतंत्र लढणार? चर्चांनंतर संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले... 
6
पोलार्ड भाऊ असं कुठं असतंय व्हय? स्टंपच्या मागे जाऊन कोण खेळत राव! (VIDEO)
7
Vivek Oberoi Networth: तब्बल १२०० कोटी संपत्तीचा मालक आहे विवेक ओबेरॉय, कुठून होते इतकी कमाई?
8
Maharashtra Politics : भाजप अर्धे मंत्रिमंडळ स्वतःकडे ठेवणार! शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय मिळणार?
9
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
10
तुम्ही एकाच वेळी २५६ लोकांना पाठवू शकता मेसेज; WhatsApp ची 'ही' ट्रिक माहितीय का?
11
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
12
Zomato चे CEO दीपिंदर गोयल २ वर्षांसाठी वेतन घेणार नाहीत, ३.५ कोटींचं पॅकेज; कारण काय?
13
Aditi Sharma : "१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
14
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
15
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
16
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
17
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
18
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
19
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
20
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ

आदिवासींच्या नावावर नोकरी मिळविणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:35 AM

बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे आदिवासींच्या नावावर नोकऱ्या बळकावणाऱ्या बोगस आदिवासींना तत्काळ नोकरीतून काढून

एम्प्लॉईज फेडरेशनची मागणी : आदिवासी विकासमंत्र्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे आदिवासींच्या नावावर नोकऱ्या बळकावणाऱ्या बोगस आदिवासींना तत्काळ नोकरीतून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी फेडरेशनच्या वतीने आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा व पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. शासकीय, निमशासकीय संस्था, बँका व विविध क्षेत्रात बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारावर अनेकांनी नोकरी बळकाविली आहे. त्यांना सेवेतून काढून टाकावे, तसेच अनुसूचित जमातीच्या नावावर पदवी मिळविलेल्यांची पदवी रद्द करावी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी व पशुवैद्यकीय महाविद्यालयात तसेच अन्य पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर प्रवेश देताना वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीवर हमीपत्राद्वारे देण्यात येणारे प्रवेश रद्द करण्यात यावे, तसेच हमीपत्राची अट रद्द करावी, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्राशिवाय हमीपत्रावर उमेदवारी पात्र ठरवू नये, नवोदय विद्यालयाच्या प्रवेशाकरिता अनुसूचित जमातीसाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक करण्यात यावे, यासह विविध मागण्यांचा निवेदनात समावेश होता. बोगस आदिवासी खऱ्या आदिवासींच्या नावावर नोकऱ्या बळकवित असल्याने खऱ्या आदिवासींना आपल्या हक्कापासून वंचित राहावे लागत आहे. सर्वाेच्च न्यायालयाने ६ जुलैला दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देताना भरत येरमे, माधवराव गावळ, आनंद कंगाले, सुनीता मरस्कोल्हे, सुरेश पेंदाम, फरेंद्र कुत्तीरकर, नानाजी आत्राम, हेमराज मसराम, बंडू तिलगामे, अरमसिंह गेडाम, वनिश्याम येरमे, राजेश्वर पदा, संदीप वरखेडे, अरविंद गेडाम, लक्ष्मण कोवे, कैलास मडावी, विनायक कोवे, हिरामण उईके, आविपचे घनश्याम मडावी, केशव तिरणकर, क्रांती केरामी, दौलत धुर्वे हजर होते.