लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : भीमा- कोरेगाव येथे विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी गेलेल्या सामान्य जनतेवर पूर्व नियोजन करून भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांची चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी तसेच संपत्तीची नुकसान भरपाई शासनाने द्यावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.या संदर्भात अहेरी येथील बसपाच्या कार्यकर्त्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या प्रकरणी सरकारने दखल न घेतल्यास गडचिरोली जिल्हा मुख्यालयी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बसपाने दिला आहे. सदर भ्याड हल्ला हे अमानवी कृत्य आहे, असे निवेदनात म्हटले आहे.निवेदन देताना बसपाचे अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख खुशाल डोंगरे, संजय अलोणे, शाहीद सुनतकर, प्रफुल दुर्गे, भारत गलबले, दीपक सुनतकर, पृथ्वीराज जुनघरे, रविकांत दुर्गे, दुर्गय्या बोरकुटे, विलास दहागावकर, सुधांशू शेंडे, विजय सुनतकर, अजय रामटेके, राजेश रामटेके, सचिन ओंडरे, राहूल गजभिये, चेतन फुलझेले, कांता कांबळे, नारायण अलोणे आदी हजर होते.
हल्ला करणाऱ्यावर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 12:39 AM
भीमा- कोरेगाव येथे विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी गेलेल्या सामान्य जनतेवर पूर्व नियोजन करून भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांची चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी तसेच संपत्तीची नुकसान भरपाई शासनाने द्यावी, ....
ठळक मुद्देनिवेदन : भीमा-कोरेगाव येथील प्रकरण