शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमदार निवडून आणणार,सन्मानाने पक्षात प्रवेश करणार'; उमेश पाटलांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
3
IPL Retention 2025 : KL राहुलने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड? धोनी ठरला 'व्हॅल्यू फॉर मनी'!
4
डबल मर्डर केसमध्ये एकाला पकडलं; ७० हजारांसाठी अल्पवयीन मुलाने रचला भयंकर कट
5
Rashmi Shukla IPS: 22 व्या वर्षी बनल्या IPS, रश्मी शुक्लांचं किती झालंय शिक्षण?
6
IND vs NZ : वानखेडेवर मुंबईकरांची दिवाळी! चाहत्यांसाठी विराट कोहली थिरकला, VIDEO
7
फटाके फोडण्याच्या स्पर्धेतून लागली भीषण आग, ४ दुकानं खाक, कोट्यवधींचं नुकसान
8
काश्मीरमधील चिनाब ब्रिजवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी, पाकिस्तानबरोबर चीनही रचतोय कट
9
हीच ती वेळ? शिंदे गटातील नेते ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची भेटीला; अचूक टायमिंगची चर्चा
10
IND vs NZ, 3rd Test : जड्डूचा 'पंजा' अन् वॉशिंग्टनचा 'चौका'; न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपला
11
शिवाजी महाराजांची मूर्ती पाहताच चिमुकली नतमस्तक, मराठी अभिनेत्रीच्या लेकीचं होतंय कौतुक; पाहा व्हिडिओ
12
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
13
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
14
एकावर ३ फ्री शेअर देणार 'ही' कंपनी, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; २७००% वाढलाय भाव
15
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
16
Singham Again Movie Review : रामायणाच्या पटलावरील अ‍ॅक्शन-कॉमेडीचा फसलेला डाव, जाणून घ्या कसा आहे सिनेमा?
17
WhatsApp ने आणलं कस्टम चॅट लिस्ट फीचर; युजर्सचा होणार मोठा फायदा, कसा करायचा वापर?
18
Gold Silver Price Review: सोन्यापेक्षा चांदीत अधिक तेजी; ऑक्टोबरमध्ये ₹४३६० महागलं गोल्ड, तर चांदी...
19
"...तोवर कायदा लागू केला जाऊ शकत नाही", UCC संदर्भात प्रशांत किशोर यांचा मोदी सरकारला सल्ला
20
आज मुहूर्त ट्रेडिंगवर खरेदी करा 'हे' 10 शेअर्स...तज्ज्ञांना दमदार परताव्याची आशा

डॉक्टरांवर कारवाई करा

By admin | Published: May 06, 2017 1:23 AM

भामरागड येथे एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने दंत चिकित्सक डॉ. रोशन दुर्गे यांनी अधिकार नसतानाही

तालुका प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क भामरागड : भामरागड येथे एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने दंत चिकित्सक डॉ. रोशन दुर्गे यांनी अधिकार नसतानाही एका लहान बाळावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये २० एप्रिल रोजी बाळाचा मृत्यू झाला. यासाठी जबाबदार असलेल्या डॉ. रोशन दुर्गे व रुग्णलयातून गायब असलेले प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नटवरलाल शृंगारे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून भामरागडचे सभापती सुखराम मडावी यांनी केली आहे. तालुक्यातील बिनागुंडा येथील धबधब्याच्या पाण्यात बुडून डॉ. आर. एल. जामी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूसाठी बिनागुंडा येथे गेलेले डॉक्टरच जबाबदार आहेत, असा आरोप होत आहे. डॉ. जामी यांच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवसापासूनच डॉ. शृंगारे फरार आहेत. बेबी पांडू तिम्मा यांच्या बाळाचा मृत्यू झाला. त्यामुळे डॉ. शृंगारे व डॉ. दुर्गे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. निवेदनावर साधू पुंगाटी, सनू पल्लो, मुरा आतलामी, अनिल लेकामी, सपना रामटेके, चिन्ना मडावी, झुरू मडावी, शोभा बत्तुलवार, संजय गावडे, देवू मट्टामी, रामजी मट्टामी, डुंगा पुंगाटी, लालसू नागोटी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.