लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वडसा वन विभागांतर्गत येणाऱ्या शिवणी (कटंगटोला) कम्पार्टमेंट क्रमांक २६७, २८६ मधील अवैैध खनन करताना पकडलेल्या दोन ट्रॅक्टर मालकांवर वन कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी शिवणी येथील शेतकऱ्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.दोन्ही कम्पार्टमेंटमध्ये मागील चार-पाच वर्षांपासून अवैैध खनन सुरू असून त्यास वन परिक्षेत्र अधिकारी देलनवाडी व वनरक्षकांचे अभय असून वनहक्क समित्यांना आर्थिक फायदा करून जवळपास ६० ते ७० लाख रूपयांचे गौणखनिज (गिट्टी, बोल्डर) चार ट्रॅक्टरच्या माध्यमाने खनन करून परस्पर कंत्राटदारांना विक्री केलेली आहे. एवढेच नाही तर वन विभागाने बांधलेल्या लूज बोल्डर बंधारा, नाला बडींग, डोंगर उतारावरील बांध वस्तीमधील गिट्टी व बोल्डर तसेच घुसी नाल्यालगतची गिट्टी, झिनगुणी पहाडावरील गौणखनिज याच ट्रॅक्टरमालकांनी अवैैध खनन करून परस्पर विक्री केली. नागरिकांच्या तक्रारीनंतर मोबाईल स्कॉडच्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी २४ मार्चला दोन्ही ट्रॅक्टर पकडून कुरखेडा येथील रेंज आॅफिसमध्ये आणले परंतु त्यांच्यावर कारवाई झाली नाही. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी लक्ष्मण डोंगरवार, खटू लंजे, दिलीप कापगते, शालिक मडावी, शेषराव मसराम यांनी वनमंत्र्यांकडे केली आहे.
अवैेध खनन करताना पकडलेल्या ट्रॅक्टर मालकांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 10:37 PM
वडसा वन विभागांतर्गत येणाऱ्या शिवणी (कटंगटोला) कम्पार्टमेंट क्रमांक २६७, २८६ मधील अवैैध खनन करताना पकडलेल्या दोन ट्रॅक्टर मालकांवर वन कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी शिवणी येथील शेतकऱ्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ठळक मुद्देवनमंत्र्यांना निवेदन : शिवणीतील शेतकऱ्यांची मागणी