गडचिरोली पोलीस दलामार्फत १७ जून राेजी गुरुवारला कोरची पोलीस स्टेशनला जॉब कार्ड वाटप व पोलीस दादा खिडकीचे उद्घाटन प्रभारी तहसीलदार बी. एन. नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ते बाेलत हाेते. याप्रसंगी कोरची पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले, सहायक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल सूर्यवंशी, समाधान फडोळ, तहसील कार्यालयाच्या लिपिक प्रांजली मेश्राम, दीपक खोब्रागडे, चित्रा जनबंधू, आशिष अग्रवाल, राहुल अंबादे तसेच गावातील नागरिक, परिसरातील ग्रामसेवक, पोलीसपाटील उपस्थित होते.
सहायक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल सूर्यवंशी यांनी शिबिरात उपस्थित जॉब कार्डधारकाला शासनाकडून वर्षाला १०० दिवसांचा रोजगार दिला जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. आंबा, फणस, बोर, काजू, सीताफळ, नारळ, शेवगा, बांबू ,करंजी अशा अनेक योजनेकरिता सदर जॉब कार्ड उपयोगात पडत असल्याचे नागरिकांना सांगितले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्तिवेतन योजना, अपंग निवृत्तिवेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, अपंगत्व एस. टी. पास सवलत योजना, श्रावणबाळ, बालसंगोपन योजना, आधारकार्ड, पॅनकार्ड, जॉबकार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड अशा विविध योजनांची माहिती दिली.
या कार्यक्रमात २२ नागरिकांना जॉब कार्ड तयार करून वाटप करण्यात आले. तसेच संजय गांधी निराधार योजनांचे दाेन फार्म भरण्यात आले. १९ दिव्यांग व्यक्तीचे तसेच शिबिरामध्ये आठ राशन कार्ड मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.