पुराडा पोलीस स्टेशनमध्ये विविध शासकीय योजनांच्या लाभाकरिता एकाच ठिकाणी अर्ज करण्याची सुविधा निर्माण होण्याकरिता एक खिड़की उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात दीपक शेळके बोलत होते. सदर उपक्रमाचे उद्घाटन खेडेगावचे सरपंच यमुलता पेंदाम व डॉ.दिनेश नाकाडे यांचा हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सी.एल. डोगंरवार होते. प्रमुख अतिथी म्हणून खेडेगावचे उपसरपंच भूमेश्वर सोनवाने, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष परसराम नाट, पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव, चंद्रकांत जवळगी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित लाभार्थांना एक खिड़की उपक्रमांतर्गत जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नाॅन क्रिमिलेयर, डोमेशियल, सातबारा, नमुना ८ आदी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. विविध दाखले व प्रमाणपत्रांकरिता परिसरातील नागरिकांना १५ ते २० कीलो मीटर पायपीट करीत तालुका मुख्यालयात जावे लागत होते, ही पायपीट या उपक्रमामुळे थांबणार आहे.
===Photopath===
150621\img_20210615_153858.jpg
===Caption===
पूराडा एक खिड़की योजनेचा शूभारंभ करताना सरपंच यमूलता पेंदाम डॉ दिनेश नाकाडे व अन्य