काेपेला येथे १० हातपंप व ५ विहिरी आहेत. परंतु तेथून तेलकट व लालसर पाणी बाहेर येते. हातपंपातील पाणी पिण्यायाेग्य नाही. उन्हाळ्यात विहिरी काेरड्या पडतात. गावात असलेल्या ६० कुटुंबातील ३५० लाेकसंख्येसमाेर पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण हाेते. त्यामुळे नागरिकांची भटकंती हाेते. सिराेंचा तालुका मुख्यालयापासून ४५ किमी अंतरावर काेपेला हे गाव आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ पासून हे गाव पाच किमी अंतरावर आहे. या गावात पक्के रस्ते व नाल्या नाही. येथे राज्य परिवहन महामंडळाची बसफेरीसुद्धा नाही. आवश्यक कामासाठी नागरिकांना स्वत:ची दुचाकी, सायकल किंवा पायी प्रवास करावा लागताे. येथे आराेग्याच्या अनेक समस्या आहेत. या भागातील नागरिक पक्के रस्ते, नाल्या व अन्य मूलभूत साेयी पुरविण्याची मागणी करीत आहेत. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येते. या परिसरातील अनेक गावांमध्ये मूलभूत साेयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे गावाचा विकास रखडला आहे.
पाणी टंचाईवर याेग्य उपाययाेजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 4:33 AM