वडसा वन विभागाअंतर्गत गडचिरोलीलगतच्या कुराडी गावातील महिला सिंधुबाई दिवाकर मुनघाटे (५५) ही गावातील काही महिलांसाेबत तेंदुपत्ता ताेडणीसाठी जंगलात गेली असता जवळच दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करुन तिला ठार केले. त्यामुळे मुनघाटे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही बाब लक्षात येताच शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख किशाेर पाेतदार यांच्या सुचनेनुसार, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सुनील पोरेड्डीवार व उपजिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांनी पुढाकार घेऊन कुराडी गावात जाऊन मुनघाटे परिवाराला आर्थिक मदत केली. तसेच त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी कुराडीचे सरपंच प्रमोद मुनघाटे, शिवसेनेचे कार्यकते नरेश चुटे, प्रवीण रामगीरवार हजर होते. स्व. सिंधुबाई मुनघाटे यांचे मुलगे लंकेश, सचिन, त्यांचे पती दिवाकर मुनघाटे तसेच गावातील नागरिक हजर होते. मुनघाटे कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, वन विभागाने लवकरात लवकर पीडित कुंटुबाला आर्थिक मदत करावी. याकरिता सर्वताेपरी पाठपुरावा करण्याचे आश्वासन सुनील पोरेड्डीवार व वासुदेव शेडमाके यांनी दिले.
कुराडी भागातील वाघांचा बंदाेबस्त करा, अन्यथा आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 4:33 AM