ग्रामपंचायत विभाजनानंतर प्रशासकच येथील सर्व कार्यभार सांभाळत असल्याने गावाचा विकास खुंटला आहे. दोन्ही गावांत ९० टक्केपेक्षा जास्त लसीकरण झाले आहे. उर्वरित लसीकरण नियमित सुरू आहे. मात्र अशाही स्थितीत प्रशासनाकडून सावंगी-गांधीनगर या दोन्ही ग्रामपंचायतीची निवडणूक घेण्याविषयी कोणत्याच हालचाली दिसून येत नाही. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने याच धर्तीवर सावंगी-गांधीनगर येथील ग्रामपंचायतची निवडणूक घेण्यात यावी. तेव्हाच विकासाला चालना मिळेल व गावातील समस्या निकाली काढण्यास मदत होईल, असे निवेदन युवक काँग्रेसचे तालुका महासचिव पंकज चहांदे, अंगराज शेंडे, पंकज बुल्ले, धनराज हनवते यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना पाठविले आहे.
240921\img-20210924-wa0080.jpg
काॕंग्रेस महासचिव पंकज चहांदे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देतांना