आंदोलनाचा दुसरा टप्पा : असहकार आंदोलन सुरूचगडचिरोली : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने ७ नोव्हेंबरपासून असहकार आंदोलन करण्यात आले आहे. सदर आंदोलन बेमुदत चालणार आहे. या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून जिल्हा परिषदेसमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातील ३०० ते ४०० ग्रामसेवक सहभागी झाले होते. कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्षांचा सेवा कालावधी नियमित करण्यासाठी निर्णय घ्यावा, ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक यांना दरमहा वेतनासोबत तीन हजार रूपये प्रवासभत्ता मंजूर करावा, ग्रामसेवक संवर्गाची शैक्षणिक अहर्ता बदलून ती पदवीधर करावी, लोकसंख्येनुसार राज्यात ग्राम विकास अधिकाऱ्यांची पदे निर्माण करावीत, ग्रामसेवकांची संख्या मर्यादित असावी, राज्यस्तरावर आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात यावा, सोलापूर जिल्ह्यातील २३९ ग्रामसेवकांवर केलेली कारवाई रद्द करावी, आदी मागण्यांसाठी ग्रामसेवक युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, सरचिटणीस दुधराम रोहणकर, कार्याध्यक्ष राजकुमार पारधी, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपूरकर, कार्याध्यक्ष नवलाजी घुटके, कोषाध्यक्ष खुशाल नेवारे, सरचिटणीस दामोधर पटले, उपाध्यक्ष व्यंकटरमन गंज्जीवार, महिला उपाध्यक्ष संतोष सडमेक, सहसचिव गोपिनाथ बोरकुटे, मंगरू मोंगरकर, विजय गडपायले, दिवाकर निंदेकर, वंदना वाढई, रणजीत राठोड, संजय बोरकर, जे. सी. ठाकरे, डी. जे. ठाकरे, एम. डी. देशमुख, योगाजी बन्सोड आर. बी. बोरकुटे, एम. एस. ऐलावार, डी. एम. राऊत, एस. टी. लोंढे, एम. एच. मेश्राम, एम. सी. वाळके, एस. व्ही. बडगू यांनी केले. (नगर प्रतिनिधी)
ग्रामसेवकांचे जिल्हा परिषदेसमोर दिवसभर धरणे
By admin | Published: November 12, 2016 2:05 AM