लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : गेल्या तीन दिवसांपासून गावाभोवती फिरत असलेल्या आजारी व जखमी अवस्थेतील बिबट्याला वन विभागाच्या चमूने मोठ्या शिताफीने जेरबंद करून उपचारासाठी शनिवारी सायंकाळी कुरखेडा येथील वन आगारात आणले. पुढील उपचारासाठी सदर बिबट्याला नागपूरनजीक गोरेवाडा येथील रेस्ट झोनमध्ये पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.मालेवाडा वन परिक्षेत्रांतर्गत कोरची तालुक्याच्या कोटगूल उपक्षेत्रातील कामेली गावालगतच्या जंगलात गेल्या तीन दिवसांपासून अशक्त व जखमी अवस्थेतील अंदाजे दीड वर्ष वयाचा बिबट फिरत असल्याची माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला दिली होती. या माहितीवरून वडसा वन विभागाचे सहायक वनसंरक्षक कैदलवार व कांबळे यांच्या नेतृत्वात पुराडाचे वन परिक्षेत्राधिकारी संजय मेहर, मालेवाडाचे वन परिक्षेत्राधिकारी कोरेवार, गडचिरोलीचे मानद वन्यजीव संरक्षक उदय पटेल व वन विभागाची चमू सदर परिसरात त्या बिबट्याच्या मागावर होती. शनिवारी कामेली गावाजवळ सदर बिबट निदर्शनास येताच वन विभागाच्या चमूने दुपारी १ वाजताच्या सुमारास मोठ्या शिताफीने या बिबट्याला गावातील एका निर्जन घरात कोंडले. त्यानंतर पिंजºयात जेरबंद करून या बिबट्याला कुरखेडाच्या वन आगारात आणले. येथे पशुवैद्यकीय अधिकाºयाच्या चमूमार्फत या बिबट्यावर औषधोपचार करण्यात आला. पुढील उपचारासाठी या बिबट्याला गोरेवाडा रेस्ट झोनमध्ये पाठविण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
बिबट्याला गोरेवाड्यात नेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 10:18 PM
गेल्या तीन दिवसांपासून गावाभोवती फिरत असलेल्या आजारी व जखमी अवस्थेतील बिबट्याला वन विभागाच्या चमूने मोठ्या शिताफीने जेरबंद करून उपचारासाठी शनिवारी सायंकाळी कुरखेडा येथील वन आगारात आणले.
ठळक मुद्देवन विभागाने केले जेरबंद : कुरखेडात प्राथमिक उपचार