बाॅक्स
या कारणांमुळे हाेताे उष्माघात
उन्हामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे. कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.
बाॅक्स
ही आहेत लक्षणे
उष्माघात झाल्यास थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्वावस्था आदी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे अधिक तीव्रतेने वाढल्यास प्रसंगी मृत्यूही ओढवू शकताे. त्यामुळे आधीच खबरदारी घेणे आवश्यक आहे.
बाॅक्स
प्रतिबंधात्मक उपाय
उष्माघात टाळण्यासाठी वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावी, उष्णता शोषून घेणारे काळे किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नयेत. सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. जलसंजीवनीचा वापर करावा. पाणी भरपूर प्यावे. सरबत प्यावे. उन्हामध्ये काम करताना अधूनमधून थाेडीशी विश्रांती घ्यावी. उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब काम थांबवावे, उन्हात बाहेर पडताना डाेळ्यांवर गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा आदींचा वापर करावा.
बाॅक्स
उष्माघातग्रस्तांवर असा करावा उपचार
उष्माघातग्रस्त रुग्णास हवेशीर खाेलीत ठेवावे. खोलीत पंखा, कुलर ठेवावे, वातानुकूलित खाेलीत ठेवावे. रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आइसपॅक लावावेत. आवश्यकतेनुसार शिरेवाटे सलाइन लावावी.
उष्माघाताची कारणे, लक्षणे व प्राथमिक उपाययोजना त्याचप्रमाणे उष्माघात होऊ नये, म्हणून घ्यावयाची काळजी याबाबत नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.