लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला व समस्त बहुजन समाजाला प्रज्ञा, शील, करूणा व समानतेची शिकवण दिली. शांती व अहिंसेचाही मार्ग सांगितला. बहुजन समाजाच्या विकासासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे जीवनात मार्गक्रमण करणे आवश्यक आहे व तसा बहुजन समाजाने प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन डॉ.यशवंत दुर्गे यांनी केले.आॅल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या वतीने मंगळवारी कोरेगाव-भीमा शौर्यदिन महोत्सव गडचिरोलीनजीकच्या वैनगंगा नदीतिरावर घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे राष्टÑीय अध्यक्ष विनय बांबोळे तर स्वागताध्यक्ष म्हणून विदर्भ अध्यक्ष गोपाल रायपुरे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून तेलंगणाचे मधु बावलकर, कार्यकारी अभियंता विजय मेश्राम, विशेष अतिथी म्हणून अॅड.शांताराम उंदीरवाडे, राज्य कार्यवाह प्रितम साखरे उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून अॅड.अर्चना कांबळे, अॅड.संतोष रामटेके, कोटगलचे सरपंच भारत खोब्रागडे, फेडरेशनच्या विदर्भ महासचिव सुनीता राऊत, विदर्भ निरीक्षक विलास साखरे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष पंडित मेश्राम, एम्लाईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष हेमंत मेश्राम, यशवंत गोवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन फेडरेशनचे प्रवक्ते दिलीप गोवर्धन यांनी तर आभार जिल्हा सचिव अरूण शेंडे यांनी मानले. जिल्हा उपाध्यक्ष रूपेश सोनटक्के, अरूण शेंडे, जयपाल मेश्राम, देवदत्त बांबोळे, मिलींद भानारकर, मनोज खोब्रागडे, प्रतिमा करमे, संजय मेश्राम, विनोद जांभुळकर, प्रफुल्ल भैसारे, नेमाजी लाडे, जगदीश मेश्राम यांनी सहकार्य केले. महोत्सवाला गडचिरोली, तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील मिळून जवळपास दीड हजार बहुजन बांधव उपस्थित होते.
बाबासाहेबांच्या विचाराने मार्गक्रमण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 11:55 PM
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला व समस्त बहुजन समाजाला प्रज्ञा, शील, करूणा व समानतेची शिकवण दिली. शांती व अहिंसेचाही मार्ग सांगितला. बहुजन समाजाच्या विकासासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे जीवनात मार्गक्रमण करणे आवश्यक आहे व तसा बहुजन समाजाने प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन डॉ.यशवंत दुर्गे यांनी केले.
ठळक मुद्देयशवंत दुर्गे यांचे आवाहन : कोरेगाव-भीमा शौर्य दिन महोत्सव; ध्वजारोहण व सलामी