शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

तळेगाव जि. प. शाळा समस्यांच्या विळख्यात

By admin | Published: September 21, 2016 2:38 AM

नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन कुरखेडाचे पं. स. सदस्य चांगदेव फाये व नगरसेवक अ‍ॅड. उमेश वालदे

छताला गळती : पदाधिकाऱ्यांच्या पाहणीत उघडकुरखेडा : नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन कुरखेडाचे पं. स. सदस्य चांगदेव फाये व नगरसेवक अ‍ॅड. उमेश वालदे यांनी स्थानिक पंचायत समिती अंतर्गत तळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली. सदर शाळेची इमारत पावसात गळत असून प्रांगणात सर्वत्र कचरा उगवला आहे. तसेच इतर समस्यांही दिसून आल्या आहेत. सदर शाळेतील असुविधांबाबत फाये व वालदे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करून शाळेच्या सुविधेत सुधारणा करण्यात यावी, अशी सूचना संबंधितांना केली. तळेगाव जि. प. शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षणाची सोय असून येथे एकूण ११६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र येथील शाळा, इमारत पडक्या स्वरूपात असल्याने पावसाळ्यात पाण्याची गळती सुरू होते. सदर इमारतीमुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळेसमोर मोठे पटांगण आहे. मात्र दुर्लक्षितपणामुळे या प्रांगणात अस्वच्छता पसरली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना खेळासाठी जागा शिल्लक उरली नसल्याचे भेटीदरम्यान फाये व वालदे यांना दिसून आले. तळेगाव शाळा इमारतीच्या मोठ्या स्वरूपाच्या दुरूस्तीचा प्रस्ताव पंचायत समितीच्या मासिक सभेत मंजूर करून घेण्यात येईल, यापुढील कार्यवाहीसाठी सदर प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती फाये यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)