शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

तेंदूपत्ता व्यवसायावर मंदीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 12:11 AM

देशभरातील बाजारपेठेत तेंदूपत्त्याच्या व्यवसायावर मंदीचे सावट आहे. काही व्यापाऱ्यांकडे गतवर्षी खरेदी केलेला तेंदूपत्ता अजूनही शिल्लक आहे. परिणामी कंत्राटदारांचे प्रचंड नुकसान झाल्याने त्यांनी तेंदूपत्त्याच्या लिलावांकडे पाठ फिरविली आहे.

ठळक मुद्देलिलावाकडे कंत्राटदारांची पाठ : अर्ध्यापेक्षा अधिक तेंदूपत्ता गोदामांमध्ये पडून

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशभरातील बाजारपेठेत तेंदूपत्त्याच्या व्यवसायावर मंदीचे सावट आहे. काही व्यापाऱ्यांकडे गतवर्षी खरेदी केलेला तेंदूपत्ता अजूनही शिल्लक आहे. परिणामी कंत्राटदारांचे प्रचंड नुकसान झाल्याने त्यांनी तेंदूपत्त्याच्या लिलावांकडे पाठ फिरविली आहे. आजपर्यंत ५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी तेंदूपत्त्याचा लिलाव आयोजित केला होता. मात्र एकाही कंत्राटदाराने हजेरी लावली नाही. त्यामुळे तेंदूपत्ता संकलन अडचणीत आले आहे.पेसा कायद्यांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात जवळपास १ हजार २०० गावांना तेंदूपत्ता संकलनाचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. यापैकी ५६ गावे वगळता उर्वरित सर्वच गावांनी स्वत:च तेंदूपत्ता खरेदी करण्याचा निर्णय यावर्षी घेतला. २०१६-१७ मध्ये तेंदूपत्ता संकलनाचे पहिले वर्ष असल्याने गावकऱ्यांना अनुभव नव्हता. त्यामुळे कंत्राटदाराच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तीन हजार ते पाच हजार रूपये प्रती स्टॅन्डर्ड बॅग (एक हजार तेंदूपुडा) दराने तेंदूपत्त्याची विक्री केली. वृत्तपत्रात जाहिरात देऊन तेंदूपत्त्याची विक्री झाल्यास अधिक किंमत मिळू शकते.ही बाब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत येणाºया गावांमधील तेंदूपत्ता लिलावाची जाहिरात द्यावी, असे निर्देश दिले. त्यानुसार मागील वर्षी जाहिराती देण्यात आल्या. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. कंत्राटदारांमध्ये स्पर्धा होऊन तेंदूपत्त्याचा भाव प्रती स्टॅन्डर्ड बॅग १२ हजार ते २२ हजार रूपयांपर्यंत पोहोचला. याचा फार मोठा लाभ ग्रामसभांना मिळाला.तेंदूपत्त्याच्या बाजारपेठेत प्रचंड मंदीचे सावट निर्माण झाले आहे. कंत्राटदारांनी मागील वर्षी चढ्या भावाने तेंदूपत्ता खरेदी केला होता. मात्र तेवढी किंमत बाजारपेठेत मिळाली नाही. पुढे भाव वाढतील या उद्देशाने तेंदूपत्ता साठवून ठेवला. मात्र मंदीचे सावट न हटल्याने भाव वाढू शकला नाही. परिणामी काही कंत्राटदारांचे गोदाम अजुनही तेंदूपत्त्याने भरून आहेत. त्यामुळे सदर कंत्राटदार यावर्षी तेंदूपत्ता खरेदी करण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला मे महिन्याच्या शेवटी सुरूवात होणार आहे. १०० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी जाहिरात काढून लिलाव आयोजित केला. मात्र लिलावाला एकही कंत्राटदार आला नाही. त्यामुळे तेंदूपत्त्याची विक्री झाली नाही. परिणामी ग्रामसभांना दुसऱ्यांदा लिलाव ठेवावा लागत आहे. दुसºयाही फेरीत कंत्राटदार हजेरी लावतील, याची शाश्वती राहिली नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली असल्याचे दिसून येत आहे.वन विभागाला मिळाला गतवर्षीच्या तुलनेत केवळ १० टक्के दरगडचिरोली वगळता विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तेंदूपत्त्याचे लिलाव झाले आहेत. यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत केवळ १० टक्के भाव मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाचे १० युनिट आहेत. पहिल्या दोन राऊंडला एकाही कंत्राटदाराने निविदा भरली नाही. तिसºया वेळी एका युनिटसाठी केवळ एकाच कंत्राटदाराने निविदा भरली आहे. मागील वर्षी वन विभागाला पाच ते सात हजार रूपये प्रति स्टॅन्डर्ड बॅग भाव मिळाला होता. यावर्षी मात्र ४०० ते ५०० रूपये भाव मिळाला आहे. यामुळे वन विभागाचेही प्रचंड नुकसान झाले आहे.जिल्हाभरातील तेंदूपत्ता कंत्राटदार आले एकत्रतेंदूपत्ता संकलन करणारे जेमतेम १५ ते २० कंत्राटदार आहेत. मागील वर्षी स्पर्धा होऊन चढ्या भावाने तेंदूपत्ता खरेदी करावा लागला होता. मात्र तेवढा भाव बाजारात न मिळाल्याने प्रचंड नुकसान सहन करावे लागले. याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी यावर्षी सर्व कंत्राटदारांनी एकत्र येत पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये तेंदूपत्ता खरेदी न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. काही कंत्राटदार तर रॉयल्टीची रक्कम न देताच केवळ मजुरी देऊन तेंदूपत्ता खरेदी करण्यास तयार असल्याची माहिती पुढे आली आहे.तेंदूपत्ता कंत्राटदार मजुरांच्या मदतीने तेंदूपत्ता तोडते. यातील सर्वच मजुरांच्या बँक खात्यात मजुरीची रक्कम जमा करावी, असे शासनाचे निर्देश असले तरी सर्वच मजुरांकडे बँक खाते राहत नाही. त्याचबरोबर मजुरही रोखीने मजुरी घेण्यास पसंती दर्शवितात. मागील वर्षी वेलगूर येथील तेंदूपत्ता मजुरांना मजुरीची रक्कम देण्यासाठी नेली जात असताना पोलिसांनी आलापल्ली येथे कारवाई करून रोकड जप्त केली होती. त्यामुळे ही कंत्राटदारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.