लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशभरातील आकांक्षित (मागास) जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या राज्यातील चार पैकी तीन जिल्ह्यांनी वीज जोडणीचे उद्दिष्ट जवळजवळ पूर्ण केले आहे. त्यात आतापर्यंत वीज पुरवठ्यापासून वंचित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ६२४२ कुटुंबांपैकी ६२२३ कुटुंबांत वीज जोडणी देण्यात प्रशासनाला यश आले आहे.विस्तारित ग्रामस्वराज अभियानांतर्गत केंद्र सरकारने प्रधानमंत्री ‘सहज बिजरी हर घर’ ही योजना आणली. त्यानुसार महाराष्टÑातील गडचिरोली, नंदूरबार, उस्मानाबाद आणि वाशिम या चार आकांक्षित जिल्ह्यांमध्ये वीज पुरवठा नसलेल्या ३६ हजार १९९ कुटुंबांमध्ये वीज कनेक्शन देण्याचे लक्ष्य निश्चित केले होते. त्यात वाशिम जिल्ह्याने २१६५ तर उस्मानाबाद जिल्ह्याने ५७५९ कुटुंबांना वीज पुरवठा देऊन आपले लक्ष्य १०० टक्के गाठले आहे. मात्र नंदूरबार जिल्ह्यात ९४.१५ टक्केच लक्ष्यपूर्ती झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात ६ हजार २३८ कुटुंबांपैकी ६ हजार २१९ कुटुंबांना वीज देण्यात आली. उद्दिष्टामध्ये समावेश असलल्या एटापल्ली तालुक्यातील मांढरी या गावातील अवघ्या १९ कुटुंबांना वीज कनेक्शन देणे बाकी आहे. त्यांच्या गावापर्यंत वीज पुरवठा करणे अशक्य असल्यामुळे त्यांची घरे सौर उर्जेतून प्रकाशमान केली जाणार आहेत.या योजनेतून गडचिरोली जिल्ह्यातील २८१ गावांत वंचित कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक गरीबांची घरे प्रकाशमान झाली.मांढरी गाव होणार सौरऊर्जेने प्रकाशमानआकांक्षित जिल्हा अंतर्गत ५४ गावांमध्ये वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट महावितरणला दिले होते. त्यापैकी एटापल्ली तालुक्यातील मांढरी या गावात वीज पोहोचविणे शक्य नाही. त्यामुळे सदर गावात मेडाच्या मदतीने सौरऊर्जेवरची उपकरणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या गावात १९ कुटुंबांना वीज जोडण्या देण्याचे उद्दिष्ट होते. उर्वरित सर्वच गावांमध्ये उद्दिष्टाएवढा वीज पुरवठा झाला आहे.मागासपणाचा ठप्पा पुसण्यासाठी गाठायचा मोठा पल्लाकेंद्र सरकारच्या ११५ मागास जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला हा मागासपणाचा ठप्पा पुसून टाकण्यासाठी मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागात वीज पोहोचल्यानंतर आता बारमाही रस्त्यांच्या समस्येवर तोडगा काढणे गरजेचे झाले आहे. रस्ते, पाणी, निवारा या मुलभूत सोयीसुविधांपासूनच ग्रामीण भागातील नागरिक वंचित असल्यामुळे मोठ्या प्रगतीचे स्वप्न त्यांच्यासाठी दिवास्वप्नच ठरत आहे.
आकांक्षित गडचिरोलीत वीजजोडणीची लक्ष्यपूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 11:47 PM
देशभरातील आकांक्षित (मागास) जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या राज्यातील चार पैकी तीन जिल्ह्यांनी वीज जोडणीचे उद्दिष्ट जवळजवळ पूर्ण केले आहे. त्यात आतापर्यंत वीज पुरवठ्यापासून वंचित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ६२४२ कुटुंबांपैकी ६२२३ कुटुंबांत वीज जोडणी देण्यात प्रशासनाला यश आले आहे.
ठळक मुद्दे६२२३ कुटुंबांना लाभ : दुर्गम भागही झाला प्रकाशमान