लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणुकीसाठी आता जेमतेम सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू होताच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. गडचिरोली-चिमूर मतदार संघासाठी भारतीय जनता पक्षात तिकिटासाठी कोणतीही स्पर्धा नसली तरी काँग्रेसमध्ये मात्र रस्सीखेच सुरू झाली आहे. यावेळी आपल्यासाठी वातावरण अनुकूल राहील असा विचार करून काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांनी फिल्डींग लावणे सुरू केले आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने विजयी होऊन पहिल्यांदाच लोकसभेत पोहोचलेले भाजपचे खासदार अशोक नेते यांनी गेल्या पाच वर्षात मतदार संघाच्या बहुतांश भागात जनसंपर्क ठेवून आपली पकड घट्ट केली आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया अशा तीन जिल्ह्यात पसरलेल्या या मतदार संघाचे विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र पाहता सर्व भागात जनसंपर्क ठेवणे एक आव्हान असले तरी नेते हे आव्हान पेलण्यात बºयाच प्रमाणात यशस्वी झाले. त्यामुळेच आज भाजपमध्ये त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय अजूनतरी समोर आलेला नाही. विद्यमान पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नावाचीही अधूनमधून चर्चा सुरू असते. पण विजयाच्या निकषावर ते कितपत खरे उतरतील याबाबत भाजपकडूनच शंका उपस्थित केली जात असल्याने त्यांच्या नावाची चर्चा निव्वळ वावड्या ठरत आहे.दुसरीकडे काँग्रेसमध्ये मात्र दिवसागणिक चुरस वाढत आहे. गेल्यावेळी मोदी लाट होती, पण यावेळी मात्र सक्षम पर्याय म्हणून काँग्रेसच्या उमेदवाराला विजयाची संधी असल्याचे गृहित धरून इच्छुकांची संख्या वाढत आहे. त्यात प्रामुख्याने माजी आमदार तथा काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष डॉ.नामदेव किरसान आणि युवा नेते म्हणून डॉ.नितीन कोडवते यांचे नाव समोर केले जात आहे. परंतू उमेदवार निवडताना त्याचे वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या तीनही गोष्टी महत्वाच्या ठरणार आहे. निवडणुकीच्या रणांगणात उतरताना या तीन गोष्टींवरच उमेदवार तग धरू शकणार आहे. त्यामुळे या तीन निकषांचा विचार केल्यास अनुभवहीन युवा नेतृत्व भाजपच्या मुरब्बी नेत्यांसमोर तग धरू शकेल का? अशी शंका काँग्रेसच्या एका गटाकडून व्यक्त केली जात आहे.पक्षाने आदेश दिल्यास स्वत: निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची तयारी ठेवणाºया माजी खासदार मारोतराव कोवासे यांनी काही दिवसांपूर्वीच साजऱ्या झालेल्या जल्लोषपूर्ण वाढदिवसाच्या निमित्ताने आपण अजून निवृत्त झालेलो नाही हे दाखवून दिले. तरीही चिरंजीव विश्वजित यांच्या राजकीय भवितव्याच्या हमीवर स्वत: माघार घेऊन डॉ.नामदेव उसेंडी यांच्या नावाला ते पाठींबा देऊ शकतात. सुरूवातीला विधानसभेसाठी जास्त इच्छुक असणाऱ्या डॉ.उसेंडी यांनी अलिकडे लोकसभेची ‘रिस्क’ घेणे फायद्याचे समजत तयारी सुरू केली आहे. तिकडे गोंदिया जिल्ह्यातील डॉ.नामदेव किरसान या माजी उत्पादन शुल्क आयुक्तांनी गेल्या पाच-सहा वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय होऊन पक्षबांधणीच्या कामात हातभार लावला आहे. त्यामुळे गडचिरोली-चिमूर मतदार संघासाठी आपणच योग्य पर्याय असल्याचे त्यांनीही पक्षश्रेष्ठींपुढे बिंबवले आहे.वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाच्या निकषावर हे सर्व नेते सरस असले तरी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या गटाने युवा नेते म्हणून डॉ.नितीन कोडवते यांना पुढे करत कामी लागण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉ.कोडवते यांनी लोकसभा क्षेत्रात मागील काही दिवसांपासून जनसंपर्क सुरू केला आहे.आ.विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आपण विजयी होऊ असा विश्वासही त्यांना आहे. मात्र तिकीट आपल्यालाच मिळेल का, याबाबत डॉ.कोडवते स्वत:च साशंकता व्यक्त करीत आहे.
काँग्रेसच्या तिकिटासाठी रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:47 AM
लोकसभा निवडणुकीसाठी आता जेमतेम सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू होताच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. गडचिरोली-चिमूर मतदार संघासाठी भारतीय जनता पक्षात तिकिटासाठी कोणतीही स्पर्धा नसली तरी काँग्रेसमध्ये मात्र रस्सीखेच सुरू झाली आहे.
ठळक मुद्देनेत्यांना लागले लोकसभेचे वेध : वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वावर ठरणार उमेदवारी