शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

एकाच दिवशी २९ लाख ५१ हजारांचा कर वसूल

By admin | Published: November 12, 2016 2:03 AM

राज्य सरकारने ११ नोव्हेंबर रोजी राज्यातील नगर पंचायती व नगर पालिकांमध्ये जुन्या रद्द झालेल्या ५०० व १००० च्या

रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरूच : दोन नगरपालिकांसह १० नगर पंचायतीत थकबाकी वसुलीचे कामगडचिरोली : राज्य सरकारने ११ नोव्हेंबर रोजी राज्यातील नगर पंचायती व नगर पालिकांमध्ये जुन्या रद्द झालेल्या ५०० व १००० च्या नोटांच्या भरवशावर कर भरण्याची सवलत दिल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात दोन नगर पालिकांसह १० नगर पंचायतीत एकूण २९ लाख ५१ हजार १४० रूपयांचा कर एकाच दिवशी नागरिकांकडून वसूल करण्यात आला.जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या गडचिरोली नगर पालिकेत शुक्रवारी सकाळी १० वाजतापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७ लाख १ हजार १२६ रूपयांची वसुली कराच्या रूपाने झाली. यामध्ये गृह/मालमत्ता करापोटी ५ लाख ३६ हजार १०३ रूपये, पाणीपट्टी करापोटी १ लाख ६५ हजार २३ रूपये वसूल करण्यात आले. रात्री सुध्दा कर वसुलीचे काम सुरू राहणार असल्याचे पालिकेच्या कर विभागाचे निरिक्षक सुरेश भांडेकर यांनी लोकमतला सांगितले.जिल्ह्यातील सर्वात जुनी नगर पालिका असलेल्या देसाईगंज येथे सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकत्रीत मालमत्ता कर २ लाख ५० हजार ६४१ रूपयांच्या कराची वसुली करण्यात आली. यात गाळे भाडे ४२०९४, पाणीपट्टी कर १ लाख १४ हजार ९५० असा एकूण ४ लाख ७ हजार ६८५ रूपयांचा भरणा करण्यात आला. मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कर भरण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी तैमूर मुलानी यांनी लोकमतशी बोलताना दिली.एटापल्ली नगर पंचायतीत सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३७ हजार ४८२ रूपयांची वसुली नागरिकांकडून करण्यात आली. नगराध्यक्ष सरीता प्रसाद राजकोंडावार, सुशिल कोकणी यांच्या मार्गदर्शनाखाली न.पं.चे कर्मचारी आर. एम. येरमे, के. एन. कागदेलवार, व्ही. जी. मोहुर्ले, पी. टी. कपाटे, एल. टी. दुर्गे, आर. एम. गर्गम यांनी घरोघरी जाऊन कर वसुली केली. या संपूर्ण रक्कमेत नागरिकांकडून रद्द झालेल्या ५०० व १००० च्या नोटा मिळाल्या. कर मोहीम वसुलीच्या वेळी नगर पालिकेतर्फे लाऊडस्पीकर लावून नागरिकांना कर भरण्याबाबत आवाहन करण्यात आले. विशेष म्हणजे, चार ते पाच हजारांची वसुली होत असते. मात्र शुक्रवारी एकाच दिवशी ४० करदात्यांनी कराचा भरणा केला.सिरोंचा नगर पंचायतीत एकाच दिवशी ४४ हजार ६६८ रूपयांची वसुली दुपारी ४ वाजेपर्यंत करण्यात आली.भामरागड नगर पंचायतीत शुक्रवारी ७ हजार ८३० रूपयांची कर वसुली झाली. सकाळी १० वाजतापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे काम चालले. शहरात ध्वनीक्षेपक फिरवून नागरिकांना कर भरणा करण्याबाबत व जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार असल्याचीही माहिती देण्यात आली होती.मुलचेरा नगर पंचायतीत सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३० हजार ४५० रूपयांची कर वसुली झाली. येथे कर वसुलीला गुरूवारपासून प्रारंभ करण्यात आला. शुक्रवारी रात्री ११ वाजेपर्यंत ४० हजारांच्या आसपास कर वसुली होईल, अशी माहिती मुख्याधिकारी समशेर पठाण यांनी दिली.धानोरा नगर पंचायतीत शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ११ हजार ५७३ रूपयांची वसुली झाली होती. यामध्ये पाणीपट्टी कर २ हजार २८३, मालमत्ता कर ९ हजार २९० रूपये वसूल करण्यात आला. कुरखेडा येथे शुक्रवारी सकाळपासून ८० हजार रूपयांची कर वसुली करण्यात आली. न.पं.ची दैनंदिन सरासरी कर वसुली ५ ते ७ हजार रूपये राहते. मात्र ५०० व १००० च्या नोटा स्वीकारण्यात आल्याने रात्री १२ वाजेपर्यंत कर भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे, अशी माहिती नगरसेवक अ‍ॅड. उमेश वालदे, वसुली कारकून नामदेव कोसरे, देविदास देशमुख, रोशन मेश्राम यांनी दिली. आरमोरी नगर पंचायतीत मालमत्ता व पाणी कराची शुक्रवारी ४ लाख ५९ हजार ७२८ रूपयांची वसुली करण्यात आली. १००० च्या २१० नोटा तर ५०० च्या ४८७ नोटा सायंकाळी ६ वाजेपर्यंत जमा झाल्या होत्या. आरमोरीत मालमत्ता करापोटी ४ लाख ७ हजार ९७८ तर पाणी पट्टी कराचे ४५ हजार रूपये वसूल करण्यात आले. कोरची येथे नगर पंचायतीकडे सायंकाळी ६ वाजेपर्यंत १ लाख ४५ हजार ५९४ रूपयांचा कर जमा करण्यात आला. अहेरी नगर पंचायतीत दिवसभरात ३ लाख ३ हजार १०४ रूपयांचा कर वसूल करण्यात आला. यामध्ये एक हजाराच्या ८३ नोटा व ५०० च्या ३६६ नोटा स्वीकारण्यात आल्या. या करामध्ये चाळकर, आठवडी बाजार वसुलीही घेण्यात आली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ३ लाख ३ हजार १०४ रूपये जमा झाले होते. येथे रात्री १२ वाजेपर्यंत कर वसुलीचे काम सुरू राहणार होते. चामोर्शी नगर पंचायतीत दिवसभरात ७ लाख २२ हजार रूपयांचा कर वसूल करण्यात आला. रात्री उशीरापर्यंत कर वसुलीतून जमा झालेल्या रक्कमेचा हिशोब जोडण्याचे काम मुख्याधिकारी अर्शीया जुही यांच्या नेतृत्वात युध्दपातळीवर सुरू होते. (प्रतिनिधी)