दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील सर्व ४५६ ग्रामपंचायतींना १०० टक्के कर वसुली करण्याचे निर्देश राज्याच्या ग्राम विकास विभागासह स्थानिक जिल्हा परिषद प्रशासनाने दिले होते. मात्र जिल्ह्यातील ९० टक्के ग्रामपंचायतींना १०० टक्के कर वसुली करणे शक्य झाले नाही. सन २०१७-१८ या वर्षात ३१ मार्चअखेरपर्यंत सर्व ग्रामपंचायतीची मिळून एकूण सरासरी ७५.६८ टक्के गृहकर वसुली झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गृहकर वसुलीत बहुतांश ग्रामपंचायती माघारल्या असल्याचे वास्तव उजेडात आले आहे.गडचिरोली पं.स.मधील ५१ ग्रा.पं.ची मागील थकबाकी व चालू वर्षाची मिळून एकूण १ कोटी ७५ लाख ३९ हजार ८७६ रूपयांची गृहकराची मागणी होती. यापैकी ग्रा.पं.ने ३१ मार्चअखेरपर्यंत १ कोटी २४ लाख ५३ हजार ३१२ रूपयांची गृहकर वसुली केली. आरमोरीतील ३३ ग्रा.पं.ची मागील थकबाकी व चालू वर्षातील मिळून एकूण १ कोटी ५२ लाख ७५ हजार २५४ रूपयांची गृहकराची मागणी होती. यापैकी ग्रा.पं.नी १ कोटी १६ लाख ५१ हजार ३३९ रूपयांची गृहकर वसुली केली आहे. देसाईगंज पं.स.मधील १९ ग्रा.पं.ची एकूण १ कोटी २७ लाख ७५ हजार ५०३ रूपयांची गृहकराची मागणी होती. यापैकी ग्रा.पं.ने ८८ लाख ३२ हजार ९८३ रूपये इतक्या गृहकराची वसुली केली आहे. कुरखेडा पं.स.मधील ४४ ग्रा.पं.ची एकूण १ कोटी १२ लाख १६ हजार ९६४ रूपयांची गृहकराची मागणी होती. यापैकी ग्रा.पं.नी ९३ लाख ९५ हजार ९८० रूपये इतक्या गृहकराची वसुली केली आहे. कोरची पं.स.मधील २९ ग्रा.पं.ची ३७ लाख ११ हजार ६०० रूपये इतक्या गृहकराची मागणी होती. यापैकी ३६ लाख ३२ हजारांची गृहकर वसुली करण्यात आली. धानोरा पं.स.तील ६१ ग्रा.पं.ने ६२ लाख ४७ हजार गृहकरापैकी ५४ लाख रूपयांची वसुली केली. चामोर्शी पं.स.तील ७५ ग्रा.पं.नी ३ कोटी ६६ लाख ३४ हजार रूपयांपैकी २ कोटी ७८ लाखांची वसुली केली. मुलचेरातील ग्रा.पं.नी ५६ लाख ३८ हजार रूपयांपैकी ४५ लाख १० हजार रूपये गृहकराची वसुली केली. अहेरी पं.स.तील ३९ ग्रा.पं.नी १ कोटी १५ लाख ६७ हजार रूपयांपैकी ८३ लाख २८ हजारांची वसुली केली. एटापल्ली पं.स.तील ग्रा.पं.नी ३१ लाखांची तर सिरोंचा पं.स.तील ग्रा.पं.नी ३८ लाख २२ हजार तसेच भामरागडातील १९ ग्रा.पं.नी १४ लाखांपैकी १२ लाख रूपये गृहकराची वसुली केली.३ कोटी २२ लाखांचे कर शिल्लकगडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील एकूण ४५६ ग्रामपंचायतीची सन २०१७-१८ वर्षात वसूल करावयाचे मागील थकीत व चालू वर्षाचे मिळून एकूण ३ कोटी २२ लाख २७ हजार १७३ रूपयांचे कर सध्या शिल्लक आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील ५१ ग्रा.पं.कडे ५० लाख ८६ हजार, आरमोरी तालुक्याकडे ३६ लाख २३ हजार, देसाईगंज ३९ लाख ४२ हजार, कुरखेडा १८ लाख, कोरची ७९ हजार, धानोरा ८ लाख, चामोर्शी ८७ लाख ९८ हजार, मुलचेरा ११ लाख २७ हजार, अहेरी ३२ लाख ३९ हजार, एटापल्ली ३३ हजार, सिरोंचा ३४ लाख ७२ हजार व भामरागड तालुक्यातील १९ ग्रा.पं.चे नागरिकांकडे १ लाख ५८ हजार रूपयांचे गृहकर आर्थिक वर्ष संपूनही शिल्लक आहे.
करवसुली ७५ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:20 AM
जिल्ह्यातील सर्व ४५६ ग्रामपंचायतींना १०० टक्के कर वसुली करण्याचे निर्देश राज्याच्या ग्राम विकास विभागासह स्थानिक जिल्हा परिषद प्रशासनाने दिले होते. मात्र जिल्ह्यातील ९० टक्के ग्रामपंचायतींना १०० टक्के कर वसुली करणे शक्य झाले नाही.
ठळक मुद्देउद्दिष्टपूर्ती नाही : शेकडो ग्रामपंचायती यंदा माघारल्या