लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुलगा लहाणाचा मोठा होत असताना पालकाच्या मुलाकडून अपेक्षा असतात. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तो मुलाला शाळेमध्ये पाठवितो. पालकाच्या अपेक्षेनुसार विद्यार्थ्याला शिक्षण देऊन त्याला घडविणे ही शिक्षकांची फार मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी शिक्षकांनी पार पाडावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.आकांक्षित जिल्हा शिक्षण कार्यशाळा डीआयईसीपीडी गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेदरम्यान मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड होते. प्रमुख अतिथी म्हणून डीआयईसीपीडीचे प्राचार्य डॉ. शरदचंद्र पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी उरकुडे, ज्येष्ठ अधिव्याख्याता भोजने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भामरागड तालुक्याप्रमाणे संपूर्ण जिल्हा कॉपीमुक्त करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. यावेळी बोलीभाषा पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. आकांक्षित कार्यक्रमाबाबत अधिव्याख्याता डॉ. नरेश वैद्य, भामरागडच्या गट शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवाने यांनी दिल्ली येथे जाऊन प्रशिक्षण घेतले. या कार्यशाळेदरम्यान त्यांनी मार्गदर्शन केले. संचालन अधिव्याख्याता पुनिता मातकर तर आभार विषय सहायक कुणाल कोवे यांनी मानले.
पालकांच्या अपेक्षांचा विचार करून अध्यापन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 12:40 AM
मुलगा लहाणाचा मोठा होत असताना पालकाच्या मुलाकडून अपेक्षा असतात. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तो मुलाला शाळेमध्ये पाठवितो. पालकाच्या अपेक्षेनुसार विद्यार्थ्याला शिक्षण देऊन त्याला घडविणे ही शिक्षकांची फार मोठी जबाबदारी आहे.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत कार्यशाळा