निवेदनात नियमित, स्थायी,चटोपाध्याय समितीचे प्रस्ताव, हिंदी मराठी सूट आदींची नोंद सेवापुस्तकात घ्यावी, सर्व शिक्षकांचे वेतन एकस्तरानुसारच काढण्यात यावेत. एकस्तर कपात करून चटोपाध्यायनुसार काढू नयेत. वेतन निश्चिती केल्यानंतर त्याबाबत सर्व शिक्षकांना अवगत करावे. शिक्षकांची प्रलंबित वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके व रजाविषयक देयके त्वरित अदा करावी.
डीसीपीएसधारकांच्या पावत्यांच्या हिशेब द्यावा, विद्यार्थी शिष्यवृत्ती व उपस्थिती भत्ता मिळण्याबाबत जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करावा, विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित करावी, शिक्षण विभागास संगणक व प्रिंटर घेऊन देण्याची कार्यवाही करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश हाेता. शिष्टमंडळात समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष नरेंद्र कोत्तावार, मार्गदर्शक राजेश बाळराजे, संजय लोणारे, तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम पिपरे, सचिव संतोष लाजूरकर, कार्याध्यक्ष ओमप्रकाश साखरे, अनिल मार्तीवार, देवाजी तिम्मा, अनिल बारई, नरेश जाम्पलवार, हरी गेडाम आदी उपस्थित होते.