दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दीच्या कारणावरून यंदा जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या शासनाच्या निर्देशावरून रद्द करण्यात आल्या. तसेच शासनाने दिलेली विनंती बदल्यांची मुदतही निघून गेली. आता बदली प्रक्रिया होण्याची चिन्हे दिसून येत नसल्याने दुर्गम व अवघड भागात कार्यरत जवळपास ६०० शिक्षकांना त्याच भागात सेवा द्यावी लागणार आहे.कोरोनामुळे यंदा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरावरून होणाऱ्या ऑनलाईन बदल्या रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु शासनाने ऑनलाईन बदल्या रद्द केल्या. पुन्हा आदेश काढून शिक्षकांच्या ऑफलाईन बदल्या १५ टक्केच्या मर्यादेत कराव्या, असे निर्देश दिले. प्रशासकीय व विनंती बदल्यांबाबत शासनाचे हे आदेश होते. त्यासाठी शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी, त्यावरील हरकती व इतर सर्व बाबींची प्रक्रिया जि.प.प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. परंतु जिल्हाअंतर्गत प्रशासकीय बदली प्रक्रियेदरम्यान शिक्षकांची गर्दी होऊन कोरोनाचा धोका होऊ शकतो, हे ओळखून प्रशासकीय बदल्या रद्द करू नये, असे आदेश काढले. केवळ विनंती बदली प्रक्रिया १० ऑगस्टपर्यंत राबवावी, असे शासनाने आदेशाद्वारे कळविले होते.गडचिरोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षकांच्या विनंती बदली प्रक्रियेस मुदतवाढ मागितली होती. मात्र शासनाकडून ही मुदतवाढ मिळाली नसल्याची माहिती हाती आली आहे. कोरोना व इतर कारणामुळे जि.प.शिक्षकांची बदली प्रक्रिया यावर्षी रखडली. परिणामी दुर्गम, अतिदुर्गम व अवघड भागात कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षिकांना यंदाचे संपूर्ण शैक्षणिक सत्र त्याच भागात काढावे लागणार आहे.१५ टक्क्याच्या मर्यादेनुसार ६०० शिक्षकांच्या बदल्या होणार होत्या. यामध्ये प्रशासकीय बदलीतून ३०० व विनंती बदलीतून ३०० शिक्षक जुन्या शाळेतून नवीन शाळेत बदलीवर जाणार होते.अहेरी उपविभागातील भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा या चारही तालुक्यात दरवर्षी शिक्षकांच्या रिक्तपदाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात असतो. प्रशासकीय व विनंती बदली प्रक्रियेच्या माध्यमातून यावर्षी अहेरी उपविभागातील रिक्त जागांवर शहरानजीकचे तसेच सपाट भागातील शिक्षकांची बदली होणार होती. मात्र बदली प्रक्रिया रखडल्याने अहेरी उपविभागात शिक्षकांच्या रिक्तपदाचा अनुशेष पुन्हा वर्षभर तसाच कायम राहणार आहे. दुर्गम शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता राहणार आहे.स्थानिकस्तरावर निर्णय होणारदरवर्षी होणारी जि.प. शिक्षक बदली प्रक्रिया कोरोना लॉकडाऊनमुळे यंदा तुर्तास रखडली आहे. गतवर्षी सुद्धा शिक्षक बदली प्रक्रियेच्या मुद्यावरून काही शिक्षक संघटना न्यायालयाचे दार ठोठावल्याने ही शिक्षक बदली प्रक्रिया गतवर्षीही झाली नाही. दोन वर्षांपासून जि.प.शिक्षकांच्या बदल्या होत नसल्याने सुगम भागातील शिक्षकांचे चांगलेच फावले आहे. यावर्षी १५ टक्केच्या मर्यादेत शिक्षकांची विनंती बदली प्रक्रिया पार पाडायची की नाही, याबाबतचा निर्णय गडचिरोली जिल्हा परिषदेतर्फे स्थानिकस्तरावर घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
शिक्षकांच्या विनंती बदल्या रखडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 5:00 AM
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षकांच्या विनंती बदली प्रक्रियेस मुदतवाढ मागितली होती. मात्र शासनाकडून ही मुदतवाढ मिळाली नसल्याची माहिती हाती आली आहे. कोरोना व इतर कारणामुळे जि.प.शिक्षकांची बदली प्रक्रिया यावर्षी रखडली. परिणामी दुर्गम, अतिदुर्गम व अवघड भागात कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षिकांना यंदाचे संपूर्ण शैक्षणिक सत्र त्याच भागात काढावे लागणार आहे.
ठळक मुद्देमुदतवाढ मिळेना : ६०० शिक्षकांना दुर्गम भागात वर्षभर द्यावी लागणार सेवा