शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

ग्रामसभेने नियुक्त केले शिक्षक व आरोग्यसेवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:12 AM

शिक्षण व आरोग्याचे महत्त्व ओळखून शासनाच्या भरवशावर न राहता भामरागड तालुक्यातील होड्री ग्रामसभेने ग्रामकोशच्या निधीतून गावात शिक्षणसेवक व आरोग्यसेवकाची नेमणूक केली आहे. होड्री ग्रामसभेचा हा अभिनव उपक्रम जिल्ह्यातील इतर ग्रामसभांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

ठळक मुद्देहोड्री ग्रामसभेचा अभिनव उपक्रम : गावाने समस्यांवर स्वत:च शोधला उपाय

श्यामराव येरकलवार।लोकमत न्यूज नेटवर्कलाहेरी : शिक्षण व आरोग्याचे महत्त्व ओळखून शासनाच्या भरवशावर न राहता भामरागड तालुक्यातील होड्री ग्रामसभेने ग्रामकोशच्या निधीतून गावात शिक्षणसेवक व आरोग्यसेवकाची नेमणूक केली आहे. होड्री ग्रामसभेचा हा अभिनव उपक्रम जिल्ह्यातील इतर ग्रामसभांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.होड्री येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चवथ्या वर्गापर्यंत शाळा आहे. चार वर्ग सांभाळण्यासाठी दोन शिक्षकांची गरज आहे. मात्र जिल्ह्यात शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने या शाळेला एकच शिक्षक देण्यात आला. एका शिक्षकाला चार वर्ग सांभाळणे अशक्य होते. शिक्षकांची कमतरता असल्याने आंदोलन करूनही शिक्षक मिळणे जवळपास कठीणच होते. शिक्षक नसल्याने आपल्याच मुलाबाळांचे शैक्षणिक नुकसान होईल.ही बाब लक्षात घेऊन शिक्षकाच्या नियुक्तीबाबत भामरागड पंचायत समितीचे सभापती सुखराम मडावी यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केली. त्यांनी ग्रामकोश निधीतून शिक्षण, आरोग्य यावर २५ टक्के रक्कम खर्च करता येते, असे सांगितले. त्यानंतर २२ जुलै रोजी ग्रामसभा घेतली. २०१८ मध्ये ग्रामसभेला १ लाख ३४ हजार रूपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला. या निधीतून मासिक तीन हजार रूपये मानधनावर शिक्षण सेवकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या गावातील युवक संतोष पोरिया विडपी याची नियुक्ती करण्यात आली. १ आॅगस्ट ते ३० एप्रिल या कालावधीपर्यंत तो काम करेल, असा ठराव मंजूर करण्यात आला. रूजू होण्याचे आदेशही दिले.पावसाळ्यात शासनाचे आरोग्य कर्मचारी वेळेवर गावात पोहोचत नाही. त्यामुळे गावातीलच चिन्ना काळंगा या युवकाला आरोग्यसेवक म्हणून नियुक्ती दिली आहे. त्याला मासिक १ हजार ५०० रूपये मानधन दिले जाणार आहे. गावकऱ्यांना औषधी, गोळ्या आणून देण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविली आहे. औषधी, गोळ्यांवर होणारा संपूर्ण खर्च ग्रामकोश निधीतून केला जाणार आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना आरोग्यसेवा मिळण्यास मदत होणार आहे.होड्री ग्रामसभेने राबविलेला हा अभिनव उपक्रम आहे. या उपक्रमाचे कौतुक होत आहे. गावातील शाळेची इमारत अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे शाळा गोटूलच्या इमारतीत भरविली जात आहे. इमारत बांधून देण्याची मागणी होत आहे. जिल्हा परिषदेचे आर.एन.मिच्चा यांची बदली होड्री येथे झाली आहे.इतर ग्रामसभांसाठी प्रयोग ठरणार आदर्शपेसा अंतर्गत मोडणाºया ग्रामसभांना दरवर्षी शासनाकडून निधी प्राप्त होतो. प्राप्त झालेल्या निधीतून दरवर्षी नाल्या व सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे बांधकाम केले जाते. यातून पदाधिकाºयांना टक्केवारी मिळत असल्याने याच कामांवर विशेष भर दिला जातो. मात्र मनुष्यबळ विकासाकडे लक्ष दिले जात नाही. गावात शिक्षक नाही म्हणून अनेक गावांमध्ये आंदोलन सुरू आहेत. मात्र जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता असल्याने किमान पुन्हा सहा महिने शिक्षक मिळणे कठीण आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांचे नुकसानच होणार आहे. होड्री ग्रामसभेचा आदर्श बाळगत ग्रामसभेच्या निधीतून तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकाची नियुक्ती केल्यास विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबेल. त्याचबरोबर गावातील युवकाला रोजगार मिळण्यास मदत होईल. गावातील मुले शिकून मोठी झाल्यास गावाचे नाव मोठे होईल. त्यामुळे ग्रामकोशातील पैसा केवळ नाली व रस्ते बांधकामावर खर्च करण्याऐवजी मनुष्यबळ विकासावरही खर्च होणे गरजेचे आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद