भेंडाळा : यंदा शिक्षण विभागाने इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत पुस्तकांचे मोफत वाटप अजूनपर्यंत केले नाही. तसेच २० टक्के पुस्तकांचा पुनर्वापर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे तालुक्यातील शिक्षक गावागावांत जाऊन विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके मागत आहेत.
बऱ्याचशा शाळांनी इयत्ता पाचवी व आठवीचे ऑनलाईन क्लासेस सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांना सध्या पुस्तकाचा पुरवठा न झाल्यामुळे त्यांचा हिरमोड होत आहे. आता शाळा सुरू होऊन जवळजवळ महिना होतं आहे तरी काही विद्यार्थ्यांना पुस्तकेच मिळाली नसल्याने ऑनलाइन धडे देताना अडचणी येत आहेत. शिक्षण विभागाने गतवर्षी पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना दिलेल्या २० टक्के पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. या उपक्रमातून कागदाची बचत होऊन झाडांचे संवर्धन होण्यास मदत होणार असे सांगितले होते.
२०१९-२० किंवा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात जुनी वापरलेली पाठ्यपुस्तके शाळेत जमा करावीत, असे आवाहन शाळांनी पालक आणि विद्यार्थ्यांना केले होते. पण, अजूनपर्यंत पूर्णतः विद्यार्थ्याची जुनी पुस्तके शाळेत परत केलेली नाहीत. त्यामुळे शिक्षकांनीच घरोघरी फिरून पुस्तकांचे संकलन करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
बाॅक्स
शाळांना पुस्तके पडतात कमी
काही माेठ्या शाळा आहेत. त्यातील पटसंख्या नेहमी कमीजास्त हाेत राहते. दरवर्षीच पटसंख्येच्या तुलनेत कमी प्रमाणात पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला जाते. त्यामुळे पुस्तकांचे संकलन केले जात आहे. तसेच मागील वर्षी शाळाच सुरू झाल्या नाहीत. परिणामी काही विद्यार्थ्यांकडील पुस्तका चांगल्या असल्याने त्यांचा वापर करणे शक्य आहे.
180721\0649img_20210714_145141.jpg
शिक्षक गावागावांत जाऊन पुस्तकाचे संकलन करून नवीन विद्यार्थ्यानां देत आहेत पुस्तके