वैरागड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या कार्यपद्धतीनुसार बारावीला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्याचे गुण संगणकप्रणालीमध्ये भरण्याचे काम सुरू आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ३०:३०:४० असे बारावीच्या निकालाचे सूत्र जाहीर केले. त्यानुसार शिक्षकांनी निकाल तयार करून विद्यार्थ्यांचे गुण संगणकीयप्रणालीमध्ये भरण्याचे काम सुरू केले आहे. शाळांना विद्यार्थांचे गुण भरण्याची मुदत २१ जुलै मुदत देण्यात आली आहे. २० जुलैला आषाढी एकादशी आणि २१ जुलैला बकरी ईद असल्याने सरकारी सुटी आहे. त्यामुळे बहुतेक शाळांनी १९ जुलैला शिक्षण मंडळाच्या वेबसाइटवर आपले अंतिम निकाल अपलोड केले आहेत.
दहावीचा निकाल संगणकीयप्रणालीमध्ये भरण्याची अंतिम मुदत २ जुलै हाेती. त्यामुळे जुलै महिन्यात दहावीचा निकाल लागणार की नाही याची शक्यता नसतानादेखील शिक्षण मंडळाने १६ जुलैला दहावीचा निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी मार्ग मोकळा करून दिला आहे. त्याचप्रमाणे बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
190721\img_20210719_113241.jpg
संगणकीय प्रणालीमध्ये गुण भरताना