लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली- जिल्हयाचा निर्देशांक वाढविण्यासाठी आणि त्यांना पुढे नेण्यासाठी ‘डायलॉग गडचिरोली’ उपक्रम आपण राबवित आहोत. देशाला प्रगतीपथावर पोहचवायचे असेल सुजान नागरिक घडणे समाजासाठी अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच सर्वांगिण विकास होण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा मुळातच पाया मजबूत कसा होईल याकडे जातीने लक्ष देऊन गुरुजनांचे कर्तव्य पार पाडावेत असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीदिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या अनुरोधाने आयोजित केलेल्या शिक्षण, कौशल्य विकास आणि पायाभूत संरचना या व्दितीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी सिंग बोलत होते. यावेळी युनिसेफच्या रेश्मा अग्रवाल, आनंद घोडके, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सचिन ओंबासे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, आज स्पर्धात्मक जगात टिकण्यासाठी अत्यंत कुशल बुध्यांक असलेला विद्यार्थी टिकाव धरेल. आणि ही बाब यशस्वीरित्या राबविण्यासाठी शिक्षकांची महत्वाची भूमिका आहे. त्याचबरोबर विविध कौशल्यावर आधारित शिक्षणाची सुध्दा गरज आहे. तेव्हा शाळा, महाविद्यालयातून नौकरी मागणारे विद्यार्थी घडू नयेत तर नौकरी देणारे कुशल व्यावसायीक, संघटक तयार व्हावेत ही काळाची गरज असल्याचेहीप्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत आशा वर्कर,अंगणवाडी शिक्षीकांची सुध्दा महत्वपूर्ण जबाबदारी आहे. बालकांच्या प्रकृतीची काळजी घेणे, प्राथमिक अभ्यासक्रम शिकविणे या बाबीसुध्दा महत्वाच्या आहेत असेही ते म्हणाले.युनिसेफच्या रेश्मा अग्रवाल यांनी मार्गदर्शनपर बोलतांना म्हणाल्या की, मुलांच्या आरोग्याची तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या आहाराबाबत माहिती सांगितली. त्यांच्या जडणघडणीत प्राथमिक, माध्यमिक अभ्यासक्रमांचा वाटा महत्वाचा आहे. विद्यार्थ्याांच्या शारीरीक, मानसिकतेत बदल सातत्याने होत असायला पाहीजे. तरच पुढे जाऊन त्याला त्यांची आशा आकांक्षाची पुर्तता करता येईल. एकंदरीत विद्यार्थ्यांचा सार्वांगीण विकास होणे महत्वाचे आहे, यामध्ये शिक्षक महत्वाचा दुवा असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सभागृहाला संबोधित करतांना म्हणाले की, अप्रगत विद्यार्थी प्रगत कसा होईल याकडे विशेष लक्ष देऊन शिक्षकांनी अधिकचे वर्ग घेऊन त्यांच्या ज्ञानात भर घालावी. भाषा, गणीत , विज्ञान याकडे लक्ष देतानाचत्याच्या शारीरीक वाढीकडे, त्याच्या वाढत असलेल्या बुध्यांकाकडे लक्ष द्यावे असे ते म्हणाले. कार्यशाळेत शिक्षक, अधिकारी, कर्मचारी हजर होते.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 1:16 AM
गडचिरोली- जिल्हयाचा निर्देशांक वाढविण्यासाठी आणि त्यांना पुढे नेण्यासाठी ‘डायलॉग गडचिरोली’ उपक्रम आपण राबवित आहोत. देशाला प्रगतीपथावर पोहचवायचे असेल सुजान नागरिक घडणे समाजासाठी अत्यंत गरजेचे आहे.
ठळक मुद्देजिल्हाधिकारी यांचे प्रतिपादन : शिक्षण, कौशल्यविकास आणि पायाभूत संरचनेवर विचारमंथन