शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

शिक्षकांनी विद्यार्थ्यांची बोलीभाषा समजून घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 1:07 AM

गडचिरोली जिल्ह्यात पाचपेक्षा अधिक बोलीभाषा बोलल्या जातात. पहिली ते चवथीच्या काही विद्यार्थ्यांना मराठी भाषा समजत नाही. अशा विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांंनी त्यांच्या बोलीभाषेतून संवाद साधत मराठी भाषेतून अध्यापन करावे. यासाठी शिक्षकांना बोलीभाषेची पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील, .....

ठळक मुद्देडीआयईसीपीडीची चिंतन बैठक : शिक्षण विभागातील समस्यांवर प्राचार्यांनी केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात पाचपेक्षा अधिक बोलीभाषा बोलल्या जातात. पहिली ते चवथीच्या काही विद्यार्थ्यांना मराठी भाषा समजत नाही. अशा विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांंनी त्यांच्या बोलीभाषेतून संवाद साधत मराठी भाषेतून अध्यापन करावे. यासाठी शिक्षकांना बोलीभाषेची पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील, असा निर्णय जिल्हा शैक्षणिक व्यावसायिक विकास संस्थेच्या विभागीय चिंतन कार्यशाळेत घेण्यात आला.नागपूर विद्या प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या जिल्हा शैक्षणिक व्यावसायिक विकास संस्थांची विभागीय चिंतन कार्यशाळा गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या प्रा. मनीषा भडंग, प्राचार्य रवींद्र रमतकर, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. विनित मत्ते, डॉ. अपर्णा शंखदरवार, प्राचार्य किरण धांडे, अधिव्याख्याता मंजुषा ओंडेकर, भंडाराच्या प्राचार्य राधा अतकरी, अधिव्याख्याता अभय परिहार, चंद्रपूरचे प्राचार्य धनंजय चापले, जनार्धन कापसे, संतोष ठाकूर, राजकुमार हिवारे, गडचिरोली संस्थेचे प्राचार्य डॉ. शरदचंद्र पाटील, पांडुरंग चव्हाण, मिलींद अघोर आदी उपस्थित होते.या कार्यशाळेत अध्ययन निष्पत्ती, केंद्रप्रमुखांचे सक्षमीकरण करणे, सीआरजी, बीआरजी सदस्य, शिक्षण विस्तार अधिकारी गटशिक्षणाधिकारी या पर्यवेक्षिय यंत्रणेला योग्य प्रशिक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे, जिल्हा परिषद शाळांबरोबरच महानगर पालिका, नगर परिषदेच्या शाळांचाही दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे.गडचिरोली जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांना पायाभूत अंक ज्ञानसुद्धा नाही. त्यामुळे गणिताच्या पुढील क्रिया करताना अडचण निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांच्या पायाभूत क्षमता विकसित करण्यासाठी गडचिरोली डीआयईसीपीडी संस्था कोणते प्रयत्न करीत आहे. याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.प्रास्ताविक पांडुरंग चव्हाण, संचालन विषय सहायक कुणाल कोवे यांनी केले तर आभार संजय बीडवाईकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी डीआयईसीपीडीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थी